बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयातील गैरवर्तनाविरोधात संताप; तात्काळ कारवाईची ठाम मागणी
बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयातील गैरवर्तनाविरोधात संताप; तात्काळ कारवाईची ठाम मागणी
नेतृत्वावर ठाम विश्वास; MLA Hon. Sudhir Mungantiwar यांच्याकडे भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बल्लारपूर श्री. संदीप भाऊ पोडे यांची धडक तक्रारमहा घडामोडी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर: ग्रामीण रुग्णालयातील गैरवर्तनाविरोधात संताप; तात्काळ कारवाईची मागणी बल्लारपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून रुग्णांशी अयोग्य वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारींनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महासचिव संदीप श्रीहरी पोडे यांनी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांना सविस्तर लेखी निवेदन देत तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना वेळेवर तपासणी मिळत नाही, तसेच काही डॉक्टर व कर्मचारी रुग्णांशी योग्य प्रकारे संवाद साधत नसल्याचे समोर आले आहे. अनेकदा रुग्णांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते, तर काही ठिकाणी त्यांच्याशी उद्धट वागणूक दिली जाते. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे असून, अनेक गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे या सेवांवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत जर रुग्णालयातच गैरसोय होत असेल, तर नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीतही अपेक्षित सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. निवेदनात पुढे म्हटले आहे की, रुग्णांशी होणाऱ्या अशा वागणुकीमुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून, आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास देखील कमी होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच रुग्णालयातील सेवा सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, डॉक्टर व कर्मचाऱ्यांना रुग्णांशी सौजन्यपूर्ण वागण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच रुग्णांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या तक्रारीमुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करून रुग्णालयातील परिस्थिती सुधारावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत