Breaking News

विसापूर येथे शिवसेनेच्या वतीने गरजू नागरिकांना शिधा वाटप

 विसापूर येथे शिवसेनेच्या वतीने गरजू नागरिकांना शिधा वाटप

एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानुसार उपक्रमाचे आयोजन; युवराज भाऊ धानोरकर यांच्या सूचनेनुसार कार्यक्रम यशस्वी

माहा घडामोडी न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर :-विसापूर : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील विसापूर येथे शिवसेनेच्या वतीने गोरगरीब व गरजू नागरिकांसाठी शिधा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख मा. ॲड. युवराज भाऊ धानोरकर यांच्या सूचनेनुसार हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

 शिवसेना उपजिल्हाप्रमुख कमलेश शुक्ला आणि बल्लारपूर विधानसभा प्रमुख मा. संतोष भाऊ दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली हा शिधा वाटप कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमातून गरजू नागरिकांना शिधा वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच युवासेनेचे शहरप्रमुख विकी भरती, साहिल बोबते, रिंकू राऊत, विनोद खडसे, शंकर मोहदरे, रुपेश ताविलकर, संतोष शास्त्रकार आणि सूरज चोबे रोशन गोरडवार यांची उपस्थिती होती. शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागातून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत