Breaking News

लोकप्रिय नेते मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आश्वासन!विसापूरमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी लवकरच सुसज्ज शासकीय निवास इमारत उभारणार!

लोकप्रिय नेते मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आश्वासन!विसापूरमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी लवकरच सुसज्ज शासकीय निवास इमारत उभारणार!

माहा घडामोडी न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर:विसापूर : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने विसापूर येथे आरोग्य अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र शासकीय निवास इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष मा. चंद्रकांत जी व देऊळकर भाजपा युवा मोर्चाचे बल्लारपूर तालुका अध्यक्ष संदीप श्रीहरी पोडे यांनी केली आहे. यासंदर्भात आमदार तथा माजी मंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन सादर करून या महत्त्वपूर्ण प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. विसापूर हे परिसरातील महत्त्वाचे गाव असून येथे आरोग्य विभागामार्फत नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येतात. परिसरातील अनेक नागरिक उपचारासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेवर अवलंबून असतात. मात्र, विसापूर येथे कार्यरत असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र शासकीय निवासस्थानाची व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मुख्यालयी राहण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवा असून कोणत्याही वेळी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवू शकते. विशेषतः रात्रीच्या वेळी रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासल्यास आरोग्य अधिकारी मुख्यालयी उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांसाठी निवासाची सुविधा निर्माण करणे ही केवळ प्रशासकीय गरज नसून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची बाब आहे. या पार्श्वभूमीवर विसापूर येथे आरोग्य अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र शासकीय निवास इमारत उभारण्यात यावी, त्यासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहणे शक्य होईल आणि परिसरातील नागरिकांना अधिक तत्परतेने आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल. भाजपा बल्लारपूर तालुका अध्यक्ष चंद्रकांत देऊळकर व भाजपा युवा मोर्चाचे बल्लारपूर तालुका अध्यक्ष संदीप श्रीहरी पोडे यांनी श्री. महेश जी तुराणकर यांचा प्रमुख उपस्थिती मध्ये हा स्थानिक पातळीवरील महत्त्वाचा प्रश्न आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे मांडला आहे. तसेच संबंधित विभागाच्या माध्यमातून या कामाला प्रशासकीय मान्यता मिळावी आणि निवास इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर मार्गी लागावे, यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे. विसापूरसह परिसरातील नागरिकांना आरोग्य सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध व्हाव्यात, आरोग्य विभागाच्या कामकाजात सुलभता यावी आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळावी, या व्यापक जनहिताच्या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि स्थानिक विकासाचे प्रश्न शासनदरबारी मांडून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भूमिका यावेळी संदीप श्रीहरी पोडे यांनी मांडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत