जिवती तालुका राखीव वनक्षेत्रातून वगळण्याकरिता महसुल मंञी श्री. बावणकुळे यांच्या उपस्थित बैठक संपन्न.
आमदार देवराव भोंगळे यांच्या मागणीला यश मिळण्याची शक्यता.
जिवती तालुक्यातील बंद पडलेले तीन तलावाचे कामे सुरु होऊन सिंचन व्यवस्था व नगर पंचायत 664 घरकुलाचे प्रश्न सुटणार
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर/जिवती : जिवती तालुक्यातील बहुप्रलंबित असलेल्या विवादित वनक्षेञाचे अनूषंगाने दि.07/04/2025 रोजी महसूल मंञी यांचे दालनात मुंबई येथे बैठक संपन्न झाली. ना.चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री महसूल, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका वन क्षेत्रातून वगळण्या संबंधी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत राजुरा विधानसभा क्षेञाचे आमदार मा.देवराव भोंगळे, श्री.विवेकजी बोढे जील्हामहामंत्री, भाजयुमो.चे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, भाजपा. जिवती तालुकाध्यक्ष दत्ताजी राठोड, तालुका महामंत्री गोविंद टोकरे, भिमराव पवार, भाजयुमो तालुका अध्यक्ष अंबादास कंचकटले गोंगपा.चे गजानन जुमनाके व काँग्रेसचे उत्तम कराळे सर, यांनी उपस्थित राहून संपूर्ण तालुकाच वनक्षेत्र घोषित केल्यामुळे सर्व कामे रखडले असल्याचे व जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पट्टे नसल्याच्या समस्या मांडल्या.
प्रथम 11 गावातील वनखंडात समाविष्ट नसलेली 8649 हेक्टर जमीन वनक्षेत्रातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. व उर्वरित राहिलेल्या आणि 1980 पूर्वीच्या 11 गावे वगळून इतर गावातील जमिनीचे पट्टे वाटप केलेल्या पट्टे धरकांचे परिपूर्ण प्रस्ताव निर्वनिकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि वनविभागाला 25 एप्रिल 2025 पर्यंत राज्य सरकार महसूल मंत्री महोदय यांच्याकडे पाठविण्याचे आदेश दिले. तसेच 1980 ते 1996 पर्यंत चे अतिक्रमण बाबत शेतीच्या पट्टे बाबत 25 एप्रिल 2025 पर्यंत नोडल अधिकारी ,जिल्हाधिकारी व वनविभागाने सयुक्तिक प्रत्यक्ष पाहणी करून सकारात्मक अहवाल केंद्र सरकारच्या नावाने पाठविण्याचे आदेश देण्यात आले.
तालुक्यातील वानविभागाने अडवून ठेवलेले कोदेपूर, गुडशेला व जिवती येथील तलावाचे कामे लवकरात लवकर सुरु करण्यात येणार असून नगर पंचायत हद्दीतील 664 घरकुल बांधकाम सुरु करण्याबाबतही तोडगा काढण्याच्या सूचना केली व तालुक्यातील वादग्रस्त तेलंगणा महाराष्ट्र सीमेवरील परमडोली, मुक्कादमगुडा,कोट्टा लेंडीजळा, महाराजगुडा, आंतपूर, इंदिरानगर, पदा्मावती येसापूर, नारायगुडा, भोलापठार, लेंडीगूडा.शंकर लोधी, कामातगुडा गौरी,या चौदा गावातील जमिनीची मोजणी पूर्ण झालेले परिपूर्ण प्रस्ताव शेतकऱ्यांना लवकरात लवकर तातडीने पट्टे देण्यासाठी सबंधित विभागाला काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले .
तसेच 1980 ते 1996 पर्यंतचे महसूल विभागाने पट्टे वाटप केलेल्या पट्ट्याची चौकशी करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व वनविभाग यांना देण्यात आले .याच बरोबर लवकरच मे महिन्याच्या अखेर पर्यंत ऑनलाईन सातबारा देण्यात येतील असे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी माहिती दिली.या बैठकीला वन विभागाचे अधिकारी तसेच VC मध्ये नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, नोडेल अधिकारी नरेश झुरमुरे, वनविभाग नागपूरचे रविकिरण गोवेकर, उपसचिव वनविभाग मंत्रालय तसेच महसूल विभागातील सबंधित अधिकारी, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, भूसंपादन विभागाचे अप्पर जिल्हाधिकारी कुंभार साहेब,CCF रामगावकर ,DFO बोद्दु मॅडम ,उपविभागीय अधिकारी, राजुरा माने व संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.
Post Comment
कोणत्याही टिप्पण्या नाहीत