नागरिकांनी कोळशाची जडवाहतुक वाहने रोखली
नागरिकांनी कोळशाची जडवाहतुक वाहने रोखली
शहरातून होणाऱ्या जडवातुकीबाबत प्रशासनाची कार्यवाही शून्य
(महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी) खेमचंद नेरकर,वरोरा : वरोरा एम आय डी सी परिक्षेत्रात जीएमआर व वर्धा पावर अशा दोन वीजनिर्मिती कंपनी असून या कंपनीना वीज निर्मितीसाठी एकोना कोलमाईन्स मधून चड्डा ट्रान्सपोर्ट कोळसा पुरवठा करतात.कोलमाईन्स नी वीज कंपनीना कोळसा वाहतुकीसाठी स्वतंत्र रस्ता तयार केला नाही.परंतु गेली चार वर्षांपासून वातुकीसाठी क्षमता नसणाऱ्या रस्त्याचा वापर करीत असल्याने रस्ते पूर्णतः खराब होत आहे.18 डिसेंबरला सकाळी 6 वाजता कासम पंजा वॉर्ड नागरिकांनी जडवाहतुक रोखून धरली. तणाव निर्माण झाला.त्यानंतर नायब तहसीलदार मधुकर काळे आले आणि त्यांनी उपविभागीय अधिकारी ,नागरिक व शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांची एक मिटिंग लावून तोडगा काढल्या जाईल.असे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला व सहा तासानंतर जडवाहतुक वाहने सोडण्यात आली.
एकोना कोलमाईन्स मधून कोळसा हा जीएमआर व वर्धा पावर या वीज कंपनीना पुरवठा होत असतो.कोळसा पुरवठा करण्याचा काँट्रॅक्ट चद्दा ट्रान्सपोर्ट कडे असून जवळपास 70 ते 80 कोळसा भरलेली वाहने क्षमता नसणाऱ्या कधी ग्रामीण तर कधी वरोरा शहरातील रस्त्यावरून चालतात.पहाटे व रात्रौ दरम्यान जडवाहतुक हि शहरातील रस्त्यावरून होतात.त्यामुळे जडवाहतुकीमुळे रस्ते पूर्णतः खराब झाली आहे.प्रशासनाच्या ढिसाळ व आकार्यक्षमतेमुळे जडवाहतुक हि सर्रासपणे शहरातून होत असल्याचा आरोप कासमपंजा वॉर्ड नागरिकांनी केला आहे.गेली चार वर्षांपासून जडवाहतुक सुरू आहे .कासमपंजा वार्डातील नागरिकांची घरे ही वाहतुकीच्या रस्त्याचे कडेला असून छोटी बालके कधी -कधी रस्त्यावर येतात त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे.आणि जडवाहतुकीमुळे नागरिकांना असम्य असा त्रास सहन करावा लागतो.यापूर्वी शहरातून होणारी जडवाहतुक बंद करण्याबाबत राजकीय पक्षांनी अनेकदा आंदोलने केली परंतु प्रशासनाने आश्वासन देऊन नेहमीप्रमाणे वेळ मारून नेली.याचा अर्थ प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याची चर्चा दिसून येत होती.शहरातून जडवातुक बंद करण्यासंदर्भात प्रशासनाने कडक पावले उचलली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा नागरिकांनी दिला आहे.यावेळी आंदोलन दरम्यान शिवसेना नगरसेवक दिनेश यादव,शिवसेना शहर प्रमुख संदीप मेश्राम,सलीमभाई कराटेवाले ,भाजपचे जेष्ठ बाबाराव भागडे,अमजदखान,अनिल गाडगे,आकाश पिंगे,सलीम शेख हे सहभागी झाले होते.
शिवसेनेच्या पद्धतीने जडवाहतुक बंद करू
कासमपंजा वार्डातील नागरिकांनी जडवाहतुक रोखून धरली त्यावेळेस शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे घटनास्थळी दाखल झाले.आणि उपस्थित नायब तहसीलदार मधुकर काळे यांना शिवसेना स्टाईल ने सांगितले की,प्रशासन जर जडवातुक बंद करण्याबाबत ठोस कार्यवाही करीत नसेल तर शिवसेना पद्धतीने जडवाहतुक बंद करेल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी दिला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत