विदर्भातील जनतेची भावना लक्षात घेऊन विदर्भातील प्रसिद्ध कमलापुर पर्यटन स्थळातील हत्ती गुजरातला स्थलांतर न करता कमलापुर मध्येच भव्य एलिफंट पार्क तयार करा - रोहीत लोनारे
विदर्भातील जनतेची भावना लक्षात घेऊन विदर्भातील प्रसिद्ध कमलापुर पर्यटन स्थळातील हत्ती गुजरातला स्थलांतर न करता कमलापुर मध्येच भव्य एलिफंट पार्क तयार करावे - रोहीत लोनारे
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) चंद्रपूर :- अहेरी तालुक्यातील कमलापूर हत्ती कॅम्पमधील आठ हत्ती गुजरात राज्यातील जामनगर येथे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून उभारण्यात येत असलेल्या खासगी प्राणी संग्रहालयात ठेवले जाणार असल्याची माहिती मिळाल्याने विदर्भात सर्वसत्ररावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दि.१३/२/२०२२ ला पर्यटक व पर्यावरण,राज्यशिष्टाचार मंत्री आदीत्य ठाकरे चंद्रपुरच्या शासकीय दैर्यावर आले अस्ता वरोरानाका चौक येथे शिवसैनीकंनी स्वागता करीता त्यांचा ताफा थांबवीला याच वेळी जय विदर्भ पार्टीचे बल्लारशाह शहर अध्यक्ष युवा नेते रोहीत लोनारे यांनी आदीत्य ठाकरे यांना निवेदण दिले.
विदर्भातील जनतेची भावना लक्षात घेऊन विदर्भातील प्रसिद्ध कमलापुर पर्यटन स्थळातील हत्ती गुजरातला स्थलांतर न करता कमलापुर मध्येच भव्य एलिफंट पार्क तयार करण्यात यावे अशी मागनी जय विदर्भ पार्टीचे बल्लारशाह शहर अध्यक्ष रोहीत लोनारे यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी तालुक्यात असलेल्या कमलापूर हत्ती कॅम्पमधील आठ हत्ती गुजरात राज्यात हलविले जाऊ नये, यासाठी जनभावना लक्षात घेता शासनस्तरावर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. स्थानिक जनतेच्या आकर्षणाचे केंद्र म्हणून पर्यटकांना आपलेसे करणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये आधी सात हत्ती होते. आता नव्याने एका हत्तीच्या बाळाचा समावेश झाल्याने एकूण आठ हत्ती झाले आहेत.
वनविभागाच्या वन्यप्राणी विभागाने हे हत्ती गुजरात राज्यात नेऊन तेथील जामनगर येथे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून उभारण्यात येत असलेल्या खासगी प्राणी संग्रहालयात ठेवले जाणार असल्याचे कळते. याबाबत राज्य स्तरावर मुख्यमंत्री व वनमंत्री उद्धव ठाकरे व आपन आता अहेरी तालुक्यातच भव्य एलिफंट पार्क तयार करावे.
अन्यथा जय विदर्भ पार्टी विदर्भ भर तिव्र आंदोलन करेल असा ईशारा ही शहर अध्यक्ष रोहीत लोनारे यांनी निवेदनातुन दीला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत