Breaking News

समतानगर वार्ड नं 1 येथे राहुल बिसेन यांच्या नेतृत्वाखाली मोफत ई-श्रमिक कार्ड शिबीर संपन्न,103 कार्यकर्त्यांनी शिबिरात सहभाग घेतला

समतानगर वार्ड नं 1 येथे राहुल बिसेन यांच्या नेतृत्वाखाली मोफत ई-श्रमिक कार्ड शिबीर संपन्न,103 कार्यकर्त्यांनी शिबिरात सहभाग घेतला

(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) चंद्रपूर : भारतीय जनता पार्टी हा सदैव गरीब, गोरगरिबांसाठी काम करणारा पक्ष आहे, समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येक योजना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पोहोचते! गेल्या चार रविवारपासून प्रत्येक प्रभागात मोफत ई-श्रमिक मोफत कार्ड शिबिर भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हा सचिव राहुल बिसेन यांच्यावतीने आयोजित करण्यात येत असलेल्या प्रत्येक रविवार प्रमाणे या रविवारी समतानगर प्रभाग क्रमांक 1 शिव मंदिराजवळ मोफत शिबिराचे आयोजन राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. होम हंसराजजी अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगले, बीजेवायएम जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे व भाजपा उपाध्यक्ष रामपाल सिंग व जिल्हा प सदस्य वनिता आसुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली व राहुल बिसेन यांच्या नेतृत्वाखाली मोफत ई-श्रमिक कार्ड शिबिर घेण्यात आले यामध्ये 103 मजुरांनी सहभाग घेतला या शिबिरात 73 जण पात्र असावेत या शिबिरात भाजपच्या जेष्ठ कार्यकर्त्या गीताबाई नन्नवरे, ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष नामदेव जी आसुटकर, भाजपा कार्यकर्ते रमेश बिस्वास, राहिल शैख़ यांची उपस्तिथि होतीतसेच शेखर वानखेडे, उत्तम पासवान, दिलीप चौरे, यांचे शिबीर यशस्वी करण्यात मोलाचे योगदान होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत