बोरी तांडा येथे संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात साजरी
बोरी तांडा येथे संत सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात साजरी
(महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी) जींतूर :- बोरी तांडा येथे दरवर्षीप्रमाणे संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली दि १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता तांड्यातील समाज मंदिर प्रांगणात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर दरवर्षीच्या परंपरेनुसार महाराजांच्या प्रतिमेची वाजत गाजत व उत्साहाच्या वातावरणात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणूकीत बंजारा समाजातील महिलांनी एकसमान साडी तर पुरुषांनी फेटा व विशेष पोषाख खास आकर्षण ठरले.
बंजारा समाजाच्या वतीने प्रतिमा पूजन व मिरवणुकीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा समाजातील महिला व नागरिकांनी लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय राठोड, दिलीप राठोड, ज्ञानेश्वर राठोड, मिठ्ठू जाधव, सोमा राठोड, धनसिंग राठोड, रामा चव्हाण, जिवन जाधव, सुनील राठोड, मारोती राठोड, बाबूलाल राठोड, कृष्णा राठोड, राहू महाराज, संजय राठोड यांच्यासह बंजारा समाजातील नागरिकांनी व तरुणांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत