हळदीच्या कार्यक्रमादरम्यान घडली धक्कादायक घटना, एकाच वेळी 13 महिलांचा विहरीत पडून दुर्दैवी मृत्यू
हळदीच्या कार्यक्रमादरम्यान घडली धक्कादायक घटना, एकाच वेळी 13 महिलांचा विहरीत पडून दुर्दैवी मृत्यू
(महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी) लखनऊ : नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात लग्नाचं आनंदाचं वातावरण क्षणात दुःखात बदललं. या घटनेत एका विहिरीत अनेक महिला आणि मुली कोसळल्या. या घटनेत 13 महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे ही घटना उत्तर प्रदेशच्या कुशीनगर येथील असून घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली.
उत्तर प्रदेशच्या कुशीनगरच्या नेबुआ नौरंगिया ठाण्याच्या नौरंगिया स्कूल टोलामध्ये एका लग्नसमारंभाचा कार्यक्रम सुरू होता. बुधवारी याठिकाणी हळदीचा कार्यक्रम सुरू होता. काही महिला आणि मुली एका विहिरीच्या जाळीवर उभा होत्या. अचानक त्यांच्या वजनाने जाळी तुटली आणि त्यावर उभा असलेल्या सर्व महिला आणि मुली विहिरीत कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी पोलिसांना याबाबत कळवलं.
हेही वाचा : लग्न आटोपून घरी परतणाऱ्या वऱ्हाडी वाहनाचा भीषण अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नौरंगिया ग्रामसभेच्या स्कूल टोलावर बुधवारी रात्री सुमारे 9 वाजता एका लग्नाच्या कार्यक्रमादरम्यान विहिरीची पुजा करण्याच्या प्रथेसाठी महिला आणि मुली एकत्र जमल्या होत्या. विहीर पाण्याने भरलेली होती. गर्दी भरपूर होती. विहिरीच्या जवळ आणि विहिरीवर बांधलेल्या मचाणावर मुली व महिला बसल्या होत्या. मात्र हे मचाण कमकुवत झाल्याने ते तुटलं आणि त्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. त्यांना वाचवण्याच्या नादात इतरही अनेक महिला विहिरीत बुडाल्या. या घटनेचा सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून समजतं की लोक शिडी टाकून विहिरीत उतरले आणि मदतकार्य सुरू केलं. रात्र असल्यानं बचावकार्यात अडचणी येत होत्या, टॉर्चच्या उजेडात काम करावं लागत होतं.
हेही वाचा : गायक बप्पी लहिरी यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताच्या या घटनेबाबत शोक व्यक्त केला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट केलं की, “UPCM श्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगरच्या नेबुआ नौरंगिया पोलीस स्टेशन परिसरात विहिरीत पडून झालेल्या अपघातात लोकांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ बचाव आणि मदतकार्य करण्याचे आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत. आणखी बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
हेही वाचा : पत्नीच्या त्रासाला कंटाळून लष्करी जवानाची आत्महत्या


कोणत्याही टिप्पण्या नाहीत