Breaking News

वनविभागाच्या नाकापेक्षा मोती जड

 वनविभागाच्या नाकापेक्षा मोती जड

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात सुरू असलेला प्रकार 


नागपूर : आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात सुरू असलेला प्रकार हा वनविभागातील कर्मचान्यांना नाकापेक्षा मोती जड़ या म्हणीचा अनुभव देणारा आहे. येथे वनविभागाच्या अधिकान्यापेक्षा उद्यानात कार्यरत कंत्राटी अधिकाऱ्यांना जास्त वेतन मिळत असल्याने बहुतेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे हे कंत्राटी उद्यानाचे काम सोडून गेलेल्या एस्सेल वर्ल्ड कंपनीचे आहेत. 

कंपनीने त्यांना काढले; पण एफडीसीएमच्या वरिष्ठांनी त्यांना पोसून ठेवल्याची चर्चा विभागात आहे. वनविकास महामंडळ (एफडीसीएम) व एस्सेल वर्ल्ड कंपनी मिळून गोरेवाडा उद्यान विकासाचे काम घेण्यात आले होते. इंडियन सफारीचे काम जेमतेम झाले, पण आफ्रिकन सफारी अद्याप अधांतरी आहे. अशात एस्सेल वर्ल्ड कंपनीने एफडीसीएमशी झालेला करार मोडून काम सोडून दिले आणि परस्पर ईएमडी काढून घेतली. 

त्यामुळे एफडीसीएमच्या तत्कालीन महाव्यवस्थापकांनी कंपनीवर कारवाई करणे क्रमप्राप्त होते. मात्र कारवाई झाली बोलले जात आहे./नाही. कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना काढण्यात आले. पण मॅनेजर, क्यूरेटर व कंपनी सचिव यांना कंत्राटी तत्त्वावर कायम ठेवले एवढेच नाही तर एफडीसीएमच्या वरिष्ठांनी त्यांना मुदतवाढही दिली विशेष म्हणजे यांना लाखाच्या वर पगार आहे. जी गोरवाडाचे संचालक (डीएफओ) इतर वरिष्ठ व अधिकाऱ्यांपेक्षा अधिक आहे. हे कंत्राटी अधिकारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश देतात व त्यांना ऐकावे लागते. त्यामुळे संबंधित अधिकारीही त्रस्त असल्याचे आणि काम सोडून पूर्ववत ठिकाणी आण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत