Breaking News

वरोरा शहरातील मुख्य भाजीपाला मार्केट मधील भगवान शंकरजीच्या मूर्तीची विटंबना

 खळबळजनक- वरोरा शहरातील मुख्य भाजीपाला मार्केट मधील भगवान शंकरजीच्या मूर्तीची विटंबना 

दगडाने मूर्ती तोडल्याचा प्राथमिक अंदाज 

पोलीस आरोपीच्या शोधात 

ठाणेदार खोब्रागडे यांचे शहरवासीयांना शांतता राखण्याचे आव्हान.



वरोरा : यात्रा वॉर्डातील सब्जी मार्केट मधील एका अज्ञात इसमाने भगवान शंकरजीची मूर्ती दगडाने तोडल्याने व विटंबना केली असता शहरात एकच खळबळ उडाली आहे, सदर घटना दि.१६/०२/२०२२ रोजी रात्रीच्या सुमारास ७:३० वाजताच्या दरम्यान घडली

गेल्या३० वर्षापासून यात्रा वार्डातील सब्जीमंडी परिसरात भगवान शंकरजी यांचे स्थापित मंदिर आहे ,आणि याच परिसरात आठवडी बाजार भरतो काल घडलेल्या घटनेत एका अज्ञात समाजकंटकाने भगवान शंकरजी यांच्या मूर्तीला दगड मारून तोडले असा प्राथमिक अंदाज पोलीसानी व्यक्त केला आहे,सदर बातमी ही शहरात वार्‍यासारखी पसरली असता कुठलीही अनुचित घटना घडू नये करीत त्वरित पोलिसप्रशासनाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, सकाळी१०वाजताच्या सुमारास शांतता कमिटीची बैठक घेऊन नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले,तसेच हिंदू समाजातील काही नागरिकांनी पोलीस विभागाला एक निवेदन सादर करीत,आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी केली या घटनेमुळे काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, यावेळी तुतार्स शांतता कमिटी तसेच व हिंदू समाजाच्या माध्यमातून भगवान शंकराजी यांचा फोटो तयार करून त्या जागेवर प्रतिष्ठापना करण्यात येणार असून येत्या महाशिवरात्रीला मूर्ती बसवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले,आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस विभागाने चार पथके तयार केले असून आरोपीला तात्काळ अटक करू असे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले.

  यावेळी या बैठकीला तहसीलदार रोशन मकवाने,पोलीस उपअधीक्षक संजय सांगळे,ठाणेदार खोब्रागडे, माजी नगराध्यक्ष एहेतेशामअली,जेष्ठ साहित्यीक ना.गो.थुटे,माजी नगरसेवक छोटूभाई शेख,जयंत टेमुर्डे,विलास नेरकर,जेष्ठ पत्रकार प्रवीण खिरटकर,सुनील सिरसाट, आदी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत