वनविभागाच्या आशिर्वादाने खुलेआम अवैधरित्या मुरुमाचा उत्खनन सुरू!
संबंधित कंत्राटदार व वनअधिकरी मालामाल
(महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी) शेख हक्कानी, जिवती : टेकामांडवा फाटा ते माराईपाटण- भारी मार्गाचे काम सुरू असून विकासाच्या नावाखाली संबंधित कंत्राटदारांकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता वनविभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून टेकामांडवा- माराईपाटण परिसरात दिवसाच मोठ्या प्रमाणात खुलेआम अवैधरित्या मुरुमाची जिसीफी मशिनीच्या सहाय्याने हजोरो ब्रास मुरुम उत्खनन करून रस्त्याच्या कामाला वापला जात असुन या मुळे कंत्राटदाराचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. हा परिसर शेणगाव बिट अंतर्गत येत असल्याने या बिटाचे अधिकारी मालसुतो अभियाना मध्ये व्यस्त असल्याने खुलेआम अवैधरित्या मुरुमाची उत्खनन सुरू असल्याची बाब समोर आली आहे.
संबंधित रस्त्याच्या कामासाठी लागणारे साहित्य अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली असून सुद्धा संबंधित कंत्राटदार परिसरातील निकृष्ट दर्जाचा मुरुम उत्खनन करून रस्त्याच्या कामाला वापरण्याचा सपाटा लावला आहे.रस्त्याचा काम निकृष्ट दर्जाचा होत असल्याचे परिसरातील नागरिकांनी आरोप केला आहे. या रस्त्याच्या कामासाठी शासनानी कोट्यावधी रुपये मंजूर केले आहे जिवती तालुक्यातील रस्त्ये दर्जेदार मजबूत व्हावेत परंतु बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या आणि संबंधित कंत्राटदारांच्या मिलीभगत मुळे टेकामांडवा फाटा ते माराईपाटण-भारी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असुन या कामासाठी उच्चस्तरीय समिती नेमुण निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्यात यावी कंत्राटदाराला काळया यादीत समावेश करुन बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंतावर कठोर कारवाई करावी ? अवैधरित्या मुरुमाची उत्खनन केल्यामुळे कंत्राटदारावर व शेणगाव बिटाच्या वनअधिकारीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी परीसरातील नागरिकांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत