व्यापाऱ्यांच्या पाल्यांचा जिंतूर तालुका व्यापारी महासंघ कडून सन्मान
पोलीस उपविभागीय अधिकारी यांची उपस्थिती
(महा घडामोडी न्यूज प्रतिनिधि) जिंतूर : जिंतूर शहरातील व्यापारी क्षेत्रातील गुणवंत नामवंत ठरलेल्या पाल्यांचा सन्मान आज जिंतूर तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आला
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी पांडुरंग गोफने यांच्या हस्ते या पाल्यांचे कौतुक करण्यात आलं येथील महेश बँकेत आयोजित व्यापारी महासंघाच्या कार्यक्रमात प्रथम
डी वाय एस पी पांडुरंग गोफणे हे आल्यामुळे त्यांचा व्यापारी महासंघाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला शहरातील सर्वच प्रश्नाबाबत आपण जागरूक असून सीसीटीव्ही चालू करण्यासंदर्भात पावले उचलली जातील आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील असे उद्गार काढून व्यापारी महासंघाच्या वतीने सन्मानित केलेल्या कुमारी डॉ दीपाली शिंदे ज्या की MBBS करून पुढे MS साठी पात्र ठरली व कु शरण्या मंदार कोकडवार जी की अभ्याकस मध्ये भारतात तिसरा येण्याचा मान मिळवला यांच्या यशाबद्दल कौतुक केले
अध्यक्ष रमेश दरगड यांनी सत्कार मूर्ती ला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या तर उपाध्यक्ष प्रदिप कोकडवार यांनी शहरातील समस्या व्यक्त करून पोलीस प्रशासनास व्यापाऱ्यांचे सहकार्य नेहमी राहील असे स्पस्ट केले
कार्यक्रमाचे संचलन प्रास्ताविक प्रसिद्धी प्रमुख शेख शकील यांनी केले तर यावेळी उपस्थित गोसेवक संदीप भाई शर्मा, पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुनील तोष्णीवाल सचिव राजू देवकर संघटक संजय कोकडवार कोषाध्यक्ष सत्यनारायण शर्मा बाबा भाई पठाण प्रकाश सोनी सचिन तोष्णीवाल आयुब भाई बालाजी सांगळे पांडुरंग पल्लेवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत