आखेर राष्ट्रवादी काँग्रेस ला सोडचिठ्ठी देत दिग्गज नेत्यांचा राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश
प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व ना.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते मुंबई येथे प्रवेश
(महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी) मुंबई : सेलू जिंतूर विधानसभा मतदारसंघ संघातील दिग्गज नेत्यांनी आज (दि.१३) फेब्रुवारी रोज रविवार रोजी मुंबई येथील टिळक भवन येथे राष्ट्रीय काँग्रेस च्या प्रदेश कार्यालयात प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते राष्ट्रीय काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस सुरेश नागरे, आमदार सुरेशरावजी वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ईतर पक्षांना सोडचिठ्ठी देत राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश केला यामध्ये नानासाहेब राऊत, प्रताप देशमुख, केशवराव बुधवंत, विनोद बोराडे, अविनाश काळे, वचिष्ट गायकवाड, यांच्या सह आजी माजी नगरसेवक, पं.स.सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, समावेश अनेक पदाधिकारी व कार्यकर्ताचा सहभाग असुन या प्रवेशामुळे मुख्यतः राष्ट्रवादी काँग्रेस ला मोठे खिंडार पडले असुन स्थानिक नेतृत्वच्या मनमानी व नाराजिमुळे सोडचिठ्ठी दिली असल्याचे वृत्त आहे.
बाबत सविस्तर माहिती अशी की जिंतूर सेलु मतदारसंघाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष पद ते आमदार या प्रवासादरम्यान मनमानी व मी म्हणजेच पक्ष या मुळे आनेक दिग्गज पदाधिकारी व कार्यकर्ते दुरावले होते परंतु ओबीसी प्रदेश सरचिटणीस नानासाहेब राऊत तेथेच होते परंतु पक्षश्रेष्टींनी या बाबीकडे लक्ष न दिल्याने तसेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नानासाहेब राऊत यांनीच आपल्याला पाडल्याचा ठपका ठेवत अंतर्गत कुरबुर वाढल्याने आज अनेक जुने सहकारी सोबत घेऊन त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुरेश नागरे व आ.सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री तथा मंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते आज (दि.१३) फेब्रुवारी रोज रविवार रोजी मुंबई येथिल राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी चे ओबीसी प्रदेश सरचिटणीस नानासाहेब राऊत, भा.ज.प.जिंतूर मा. नगराध्यक्ष प्रताप देशमुख, राष्ट्रवादी चे परभणी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष केशवराव बुधवंत, राष्ट्रवादी चे सेलु नगराध्यक्ष विनोद बोराडे, राष्ट्रवादी चे जि. प. सदस्य अविनाश काळे, राष्ट्रवादी चे जिंतूर पंचायत समिती मा. सभापती वचिष्ट गायकवाड, राष्ट्रवादी चे सेलु उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, राष्ट्रवादी च्या नगर सेविका सौ. सुनिता चव्हाण, सौ. शोभाताई कोरडे, सौ. उषाताई दौंड, सौ.शेख आख्तर बेगम अय्युब, श्रीमती कमलताई झमकडे, सौ.उर्मिलाताई बोराडे, सौ. विश्रांतीताई जाधव, राष्ट्रवादी चे नगरसेवक गौतम धापसे, वाहेद अंसारी, शेख रहीम, अशोक मंत्री, चक्रधर पौळ, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष ईरशाद पाशा, जिंतूर नगर परिषद भा.ज.प.चे नगरसेवक रहेमान महमद लाडले, मा. नगरसेवक प्रदिप चव्हाण, विलास सत्वधर,भाजप जिंतूर पंचायत समिती मा. सभापती रामराव हुलगुंडे, राष्ट्रवादी जिंतूर नगरसेवक फेरोज कुरेशी, राष्ट्रवादी चे वरिष्ठ कार्यकर्ते अतिक जाहागिर, भाजप चे प्रभाकर कुर्हे चारठाणकर आदींनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
जिंतूर सेलु तालुका काँग्रेसमय करणार नानासाहेब राऊत
राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर येणाऱ्या काळात गाव तेथे शाखा ओपन करून सुरेश नागरे व सुरेशरावजी वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिंतूर सेलु तालुका काँग्रेसमय करणार असुन त्या साठी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागनार असल्याचे मत नानासाहेब राऊत यांनी व्यक्त केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत