21 वर्षीय तरुणीच्या हातून जन्मदात्या वडिलांची हत्या, लोखंडी रॉडने हल्ला केल्याचे आले समोर
21 वर्षीय तरुणीच्या हातून जन्मदात्या वडिलांची हत्या, लोखंडी रॉडने हल्ला केल्याचे आले समोर
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी याठिकाणी एक थरारक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणीने लोखंडी रॉडने हल्ला करून आपल्या जन्मदात्याचा जीव घेतला आहे. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संशयित आरोपी तरुणीनं स्वत: पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी संशयित तरुणीच्या आईला देखील ताब्यात घेतलं आहे. दोघींची कसून चौकशी केली जात आहे.
हेही वाचा : तहसीलदाऱ्यांची पारधी समाजाच्या दहेगाव वस्तीला भेट
शांतीनाथ आण्णाप्पा केटकाळे असं हत्या झालेल्या 40 वर्षीय पित्याचं नाव आहे. ते इचलकरंजी शहरानजीक असणाऱ्या बर्गे मळा येथे आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. घटनेच्या दिवशी मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास किरकोळ घरगुती कारणातून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर 21 वर्षीय मुलगी साक्षी शांतीनाथ केटकाळे हिने लोखंडी गजाने बापाच्या डोक्यात घाव घातला. हा घाव इतका भयंकर होता की या हल्ल्यात डोक्याच्या डाव्या बाजूचा चेंदामेंदा झाला.
हेही वाचा : जळगांव जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. रंजना गजरे यांची नियुक्ती
हा वार होताच घरातून एकच आरडाओरडा सुरू झाला. चिरकण्याचा आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घडलेला प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने शांतीनाथ यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी उपचारापूर्वी केटकाळे यांना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली.
हेही वाचा : मन्यार बिरादरी बोदवड मे संपन्न हुआ आदर्श विवाह
पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत रात्री उशीरा संशयित आरोपी मुलीसह तिच्या आईला ताब्यात घेतलं आहे. कौटुंबिक वादानंतर ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस हत्येच्या नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत. लेकीनेच बापाची अशाप्रकारे निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. आणखी बातम्या वाचण्याकारीटा इथे क्लिक करा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत