गायक बप्पी लहिरी यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
गायक बप्पी लहिरी यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) मुंबई : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचे वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पीटीआयनं डॉक्टरांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे.
1980 च्या दशकात आपल्या संगीत आणि गाण्यांद्वारे लोकांची मने जिंकणाऱ्या बप्पी लहिरी यांनी डिस्को डान्सर, शराबी आणि नमक हलाल यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये गाणी गायली. बप्पी लहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. ते बंगाली ब्राह्मण कुटुंबातील होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत