Breaking News

लग्न आटोपून घरी परतणाऱ्या वऱ्हाडी वाहनाचा भीषण अपघात

एकाच कुटुंबातील 4 जण जागीच ठार तर 9 जण गंभीर जखमी

(महा घडामोडी न्यूज नेटवर्क)  वाशिम : लग्न आटोपून घरी परतणाऱ्या वऱ्हाडी वाहनाला वाशिममध्ये भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 4 जण जागीच ठार झाले आहे तर 9 जण गंभीर जखमी आहे. जखमींपैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना अकोला येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेलू बाजारवरून वाशिमला येत असताना मॅक्सिमो या प्रवाशी वाहनाची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला सोयता नजीक जोरदार धडक बसून भीषण अपघात घडला. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये पिकअप व्हॅनचा चुराडा झाला आहे. पिकअप व्हॅनचा समोरच्या भाग चक्काचूर झाला आहे.

या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार झाले आहे तर 9 जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातात सावंगा जहांगीर येथील एकाच कुटुंबातील भारत शंकर गवई, पूनम भारत गवई,सम्राट भारत गवई आणि रितिका भारत गवई हे चार जण जागीच ठार झालेत तर इतर 9 जण गंभीर जखमी झाले असून त्यातील 6 जणांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी अकोला इथं पाठविण्यात आलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत