Breaking News

टेम्पो- दुचाकीची समोरासमोर धडक; युवकाचा जागीच मृत्यू

 टेम्पो- दुचाकीची समोरासमोर धडक; युवकाचा जागीच मृत्यू


(महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी) जिंतूर :
जिंतूर ते येलवरी रोडवरील पेट्रोल पंप व  वीटभट्टी समोर टेम्पो, दुचाकीच्या झालेल्या समोरा समोर अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला. सविस्तर वृत्त असे की (दि.११) फेब्रुवारी वार शुक्रवारी रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली. या  अपघातात  दुचाकीवरील सचिन जानकीराम कऱ्हाळे वय वर्ष २६ रा. पिंपळगाव काजळे जागीच मृत्यू झाला. 

दुचाकीस्वार सचिन हा आपल्या गावाहून  दुचाकी क्र. एम. एच. २२ ए. एक्स. २८८६  जिंतूर तुकडे येत होता. भरधाव येणाऱ्या टेम्पोची व दुचाकीची समोरा समोर धडक होऊन मयत सचिन कराळे हा जागीच ठार झाला. अपघातानंतर जवळपास वीस मिनिटे युवक जागेवरच पडुन होता. घटनेनंतर टेम्पो चालक आपले वाहन सोडून पसार झाला.

 सामाजिक कार्यकर्ते राम काजळे, नागेश आकात, रुग्णवाहिका वाहक  राठोड यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिंतूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. मागील तीन महिन्यांपासून जिंतूर शहर आणि तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. दोन महिन्यात आठ जणांनी  वेगवेगळ्या अपघातांमध्ये आपला जीव गमावला आहेत तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. याची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन तात्काळ रस्ते दुरुस्ती करावे असे नागरिका मध्ये चर्चा चालू होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत