Breaking News

अमरावती मनपाचे कर्तव्यदक्ष आयुक्त डॉ. प्रवीणजी आष्टीकर यांच्यावर शाई फेक प्रकरणाचा जिंतूरात निषेध

आरोपीवर कठोर कार्यवाही करण्याची निवेदनाद्वारे मागणी

(महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी) जींतूर : अमरावती महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त डॉ. प्रवीणजी आष्टीकर यांच्या वर शाई फेकून प्राणघातक हल्ला प्रकरणाचा तहसीलदार यांना निवेदन देऊन जितुरात आज निषेध करण्यात आला

 महापालिका आयुक्त यांनी केलेल्या कर्तव्यात अडथळा यावा म्हणून अपमानित करण्याचा  काही समाजकंटकांनी केलेला हा प्रयत्न निंदनीय आहे.

या घटनेचा आम्ही सर्व विश्वस्थ नागरिक आर्य वैश्य समाज जिंतूर च्या वतीने तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करीत असून  प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करून कडक कार्यवाही करावी अशी मागणी आज जिंतूर तहसीलदार यांना निवेदना द्वारे करण्यात आली

यावेळी महासभेचे बांधकाम समिती उपाध्यक्ष किरण वट्टमवार

जिल्हा उपाध्यक्ष संजय कोकडवार बाजार समिती संचालक रुपेश चिद्रवार राज्य संघटक प्रदिप कोकडवार,दिलीप चिद्रवार,दत्तात्रय लाटकर अशोक चिद्रवार, पांडुरंग पल्लेवार लक्ष्मीकांत कवठेकर नितीन चिद्रवार,सचिन रायपत्रीवार  आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत