त्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीशी काही संबंध नाही : मा . आ . विजय भांबळे
आमचे नगरसेवक काँग्रेसमध्ये गेले नाहीत माजी आमदार विजय भांबळे यांची पत्रकार परिषदेत माहिती
(महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी) जींतूर :- ते नगरसेवक व नगराध्यक्ष यांचा राष्ट्रवादीशी काही संबंध नव्हता ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले नव्हते ते अपक्ष होते त्यांनी भाजपात प्रवेश केला होता . असे प्रतिपादन मा.आ. विजय भांबळे यांनी दि . 14 फेब्रुवारी 2022 रोजी एका पत्रपरीषदेत केले . काही दिवसापुर्वी जिंतूर - सेलू येथील काही नगरसेवक व माजी नगराध्यक्ष यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला . परंतू ते सर्व अपक्ष म्हणून निवडून आले होते त्यांना भाजपात प्रवेश करत दीड वर्ष कामही केले एन . आर . सी . च्या विरोधात गेल्यावर त्यांना निलंबीत करण्यात आले होते . त्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही . काही कार्यकर्ते पक्ष सोडून गेलेत परंतू त्यांच्यामुळे आमच्या पक्षाला काहीच फरक पडणार नाही असेही यावेळी मा . आ . विजय भांबळे म्हणाले . राष्ट्रवादी पक्षाची जिल्हयात मोठी ताकद आहे . पक्षातील सर्वच समाजातील पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याचे काम आजवर आम्ही केले आहे . मी 32 पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सभापती , ज़िप .अध्यक्षपद , नगरसेवक , नगराध्यक्ष अशा अनेक पदावर बसविले त्यामुळे काही कार्यकर्ते नाराज तर होणारच . मराठवाड्यात सर्वात जास्त जिंतूर - सेलू मतदार संघातून राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य निवडणून आले आहेत . यावेळी ज़ि . प . उपाध्यक्ष अजय चौधरी उपस्थित होते .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत