'कोण आहे पुष्पा ?' च्या बॅनरची शहरात चर्चा
'कोण आहे पुष्पा ?' च्या बॅनरची शहरात चर्चा
महा घडामोडी न्यूज नेटवर्क नागपूर : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' सिनेमा प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे.त्यातील अनेक डायलॉग आणि गाण्यांची सध्या क्रेझ सुरु आहे.अनेक राजकारण्यांच्या भाषणात या चित्रपटातील डायलॉगचा वापर होत असतो.मात्र मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे या शहरामध्ये खळबळजनक असे 'कोण आहे पुष्पा? सौजन्य जनसेवा विकास समिती' या आशयाचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.त्यामुळे एकूणच चर्चांना उधाण आले आहे.मात्र याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला असता तळेगाव शहरात गटारांसाठी झाडांची कत्तल करण्यात आल्याचे निदर्शनात आले.
हेही वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील दूध संकलन केंद्र सक्रीय करा : आ. सुधीर मुनगंटीवार
नगरपरिषदेच्या भूमिगत गटारीचे पाईप आणि विद्युतीकरणाच्या कामाचे खांब टाकण्यासाठी खोदाईकाम करताना कृष्णा-आकार सोसायटीमागील ओढ्याच्या कडेच्या झाडांची कत्तल केल्याने संबंधित दोन कंत्राटदार आणि प्रशासनाविरुद्ध पर्यावरणप्रेमींमध्ये रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेकायदा झालेल्या वृक्षतोडीबाबत संबंधित प्रशासनाने 11 फेब्रुवारीला केलेल्या स्थळ पंचनाम्यानुसार संबंधित कंत्राटदार एच सी कटारिया अँड इगल इन्फ्रा तळेगाव दाभाडे आणि कुमार इलेक्ट्रीकल्स अँड इंजिनिअर्स,भुकुम, मुळशी तसेच वखारचालक सुर्या राठोड या तिघांना 14 फेब्रुवारी रोजी नोटीस बजावली आहे.
यामध्ये अनेक झाडांची कत्तल झाली असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.गावतळे सुशोभीकरणकामी गौंणखनिज उत्खनन आणि वृक्षतोड प्रकरणानंतर आता या बेकायदा वृक्षतोडप्रकरणी नगरपरिषद प्रशासन घेत असलेल्या सौम्य भूमिकेमुळे प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.याबाबत उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित कंत्राटदार,वखारचालक ,आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी करीत आहेत.याबाबत आम्ही संबंधित प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत