Breaking News

ईसापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारा हनुमान नगर प्राथमिक विकासापासून कोसो दूर

  ईसापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारा हनुमान नगर प्राथमिक विकासापासून कोसो दूर


(महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी) गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील अर्जुनी मोर तालुका नक्षलग्रस्त दुर्गम व आदिवासीबहुल तालुका म्हणून अर्जुनी-मोर तालुक्याची शासनदरबारी नोंद आहे तालुक्यात एकूण 71 ग्रामपंचायती असून त्यापैकीच एक इसापूर ग्रामपंचायत असून ही ग्रामपंचायत गटग्रामपंचायत म्हणून अस्तित्वात आलेली आहे इसापूर घाटी पळसगाव कन्नड गाव व ईसापुर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेला हनुमान नगर या ठिकाणी वीस ते पंचवीस कुटुंबाचा गेल्या पन्नास वर्षापूर्वी पासून वास्तव्य आहे इटियाडोह मुख्य कालव्याच्या किलोमीटर

३७.५०० मध्ये कालव्याच्या उजव्या बाजूला जंगलाला लागून असलेली लोकवस्ती या ठिकाणची लोकसंख्या जवळपास 125 असून अजून पर्यंत हनुमान नगर विकासापासून कोसो दूर राहिलेला आहे हनुमान नगर येथे येण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतर सुद्धा तसेच महाराष्ट्र राज्याच्या एकसष्टी नंतर सुद्धा हनुमान नगर विकासापासून कोसो दूर राहिलेला आहे याठिकाणी दळणवळणासाठी अजून पर्यंत पक्का रस्ता बनलेला नाही राज्य महामार्ग क्रमांक 275 इसापूर ते खामकुरा दरम्यान पांदन रस्ता असून अजून पर्यंत या रस्त्याला खडीकरण न झाल्याने पावसाळ्यामध्ये चिखल तुडवत जाणे-येणे करावे लागते जंगलाला लागून असलेली ही वस्ती असल्याने जंगली श्वापदांचा नेहमी त्रास सहन करावा लागतो बिबट अस्वल व इतर जंगली प्राणी यांच्या दहशतीत येथील रहिवासी जीवन व्यतीत करीत आहेत मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या वस्तीसाठी असलेले विद्युत खांब आधीच्या रचनेने असल्याने काही रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधार पसरलेला असतो हनुमान नगर येथे वाढीव विद्युत पोल ची गरज असल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात येत आहे याठिकाणी दोन हातपंप असून हे हातपंप बिघडल्यानंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागते त्यामुळे याठिकाणी शासनाने एखादी विहीर द्यावी अशी सुद्धा मागणी जनतेकडून होत आहे हनुमान नगर येथे वास्तव्य करीत असलेल्या काही लोकांना जवळपास वीस ते पंचवीस वर्षापूर्वी घरकुल मंजूर झालेले आहेत ते घरकुले मोडकळीस आलेले असल्याने शासनाने घरकुल दुरुस्तीसाठी मदत करावी अशी मागणी सुद्धा जनतेकडून होत आहे.

गेल्या पन्नास वर्षापूर्वी पासून हनुमान नगर या ठिकाणी लोकवस्ती वसलेली आहे दोन हात पंप असल्याने व ते नादुरुस्त झाल्यानंतर पाणीटंचाईला सामोरे जावे लागते त्यामुळे शासनाने एखादी विहीर करून द्यावी.

 जगदीश बोळणे, रहिवासी हनुमान नगर

गेल्या अनेक वर्षांपासून हनुमान नगर रहिवासी असून आम्हाला शासनाकडून वीस ते पंचवीस वर्षापूर्वी घरकुले मिळालेली आहेत मिळालेले घरकुल मोडकळीस आल्याने ती दुरुस्त करण्यासाठी सरकारने मदत करावी.

 सौ.विमल विनोद वकेकार, ग्रामस्थ हनुमान नगर

 हनुमान नगर ही लोकवस्ती दुर्लक्षित राहिलेली आहे दळणवळणासाठी असलेला पांदण रस्ता खडीकरण करून मजबूत करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून बनविण्यासाठी घेतलेला आहे विद्युत खांब व्यवस्था तसेच विहीर बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मी हनुमान नगर येथील वास्तव्य असून येथील सोयी सुविधा पूर्तता करणे तसेच संपूर्ण ग्रामपंचायत परिसराचा विकास करणे यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील मी प्रथमच सरपंच झाल्याने विकास कामे प्राधान्य क्रमाने करू.

 सरपंच सौ.कल्पना शिवकुमार करंबे, ग्रामपंचायत इसापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत