अल्पवयीन मुलाला बॅट-पट्ट्याने अमानुष मारहाण,
अल्पवयीन मुलाला बॅट-पट्ट्याने अमानुष मारहाण,
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) पुणे : पुण्यात गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नाही. विशेष म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नाही. त्यामुळेच कधी कुणी इन्स्टाग्रामवरदहशत माजवणारे व्हिडीओ बनवतं तर कधी बेशिस्त तरुण दहशत माजवण्यसाठी हिंसाचार करतात. पुण्यात अल्पवयीन तरुण गुन्हेगारीकडे वळण्याचं प्रमाण प्रचंड वाढताना दिसत आहे. या गुन्हेगारीला थांबवणं आता पोलिसांपुढे मोठं आव्हान बनलं आहे. पोलीस या गुन्हेगारीला थांबवतील किंवा न थांबवतील हा खूप पुढचा विषय आहे. पण जे सुरुय ते प्रचंड भयानक आहे. पुण्यातला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका लहान मुलाला चार ते पाच तरुण मिळून क्रिकेटच्या बॅटने आणि कंबरेच्या पट्ट्याने इतकं निर्घृणपणे मारहाण करतात की त्या मुलाच्या अंगाची अक्षरश: लाहीलाही होते. तो जिवाच्या आकांताने आपल्याला मारु नका म्हणून विनंती करतो. तरी गेंड्याच्या कातडीचे मन असलेले नराधम त्याला मारहाण करणं सोडत नाहीत. याशिवाय मारहाण करणाऱ्या तरुणांची इतकं मजल की त्यांनी संबंधित मारहाणीची घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करत व्हायरलही केलीय. संबंधित व्हिडीओ जो बघतोय त्याचं मन विषण्ण होतंय, इतका भयानक तो व्हिडीओ आहे.
संबंधित घटना ही पुण्यातील येरवडा परिसरात घडल्याची माहिती समोर आली. पीडित मुलावर कबुतर चोरीचा आरोप करत या मुलाला त्याच्याच भागातील मुलांनी शाळेच्या मैदानात कपडे काढून मारहाण केली. आरोपी मुलांनी कोणताही मागचा पुढचा न विचार करता पीडित मुलाला अमानुषपणे मारहाण केली. त्यांनी पीडित मुलाच्या डोक्यावर, कंबरेवर, पाठीवर बॅट आणि काठीने मारहाण केली. त्यांनी मारहाण करत असताना एकाच्या हातातील काठी तुटते. पण तरीही ते मारहाण करतात. यावेळी पीडित मुलगा त्यांना मारहाण करु नका. मी तुमचं कबुतर चोरलेलं नाही म्हणत विणवण्या करतं. पण आरोपींना पाझर फुटत नाही. ते तरीही त्याला मारहाण करतात.
हा सर्व प्रकार घडत असताना आरोपींमधील काहीजण त्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात संबंध प्रकार कैद करत असतात. ते त्यानंतर संबंध व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही पोलिसांपर्यंत याबाबत खबर लागत नाही. अखेर संबंधित व्हिडीओ पीडित मुलाच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचतो. त्यानंतर पीडित मुलाच्या आई-वडिलांनी पोलिसात धाव घेतली. तिथे त्यांनी पोलिसांना सर्व प्रकार सांगत व्हिडीओ दाखवला.
पोलिसांनी संबंध प्रकार समजून घेतला. यावेळी पीडित मुलगाही पोलीस ठाण्यात आला होता. घडलेला प्रकार सांगताना पीडित मुलाला अश्रू अनावर झाले. पोलिसांनी या घटनेची दखल घेत तातडीने मारहाण करणाऱ्या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस सखोल तपास करत आहेत. पण हे कायद्याचं राज्य आहे. इथे असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. हे पोलीस त्यांच्या कारवाईतून दाखवून देतील, अशी आशा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत