Breaking News

ट्राईफेड इंडिया आणि प्रकल्प कार्यालयातर्फे शीला उईके यांचा सत्कार

ट्राईफेड इंडिया आणि प्रकल्प कार्यालयातर्फे शीला उईके यांचा सत्कार


महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधि संतोष रोकड़े गोंदिया : येथील नगरसेविका आणि सामाजिक कार्यकर्ते शीला सुरेश उईके यांच्या विशेष सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय देवरीच्या वतीने प्रकल्प अधिकारी राचेलवार यांच्या हस्ते देवरी येथे त्यांना शाल,श्रीफळ आणि प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.ट्राईफेड इंडिया संस्थेच्या वतीने राणी दुर्गावती वनविकास केंद्रात उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी प्रकल्पाचे आकाश सरकार आणि रोहित शिंदे उपस्थित होते.उईके यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल ऑल इंडिया आदिवासी फेडरेशनने अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत