मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात शंभर किमी पाणंद रस्त्यांना मंजूरी
मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात शंभर किमी पाणंद रस्त्यांना मंजूरी
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलीत.
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सन २०२२-२३ या वर्षाच्या आराखडयात शंभर किलोमीटर लांबीचे पाणंद रस्ते मंजूर करण्यात आले आहेत. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांच्या फलस्वरूप या पाणंद रस्त्यांना मंजूरी देण्यात आली आहे. रोहयो मंत्री श्री. सांदीपन भुमरे यांच्याकडे आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करून विशेष बाब या सदराखाली या पाणंद रस्त्यांना मंजूरी मिळविली आहे.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील या मंजूर पाणंद रस्त्यांमध्ये प्रामुख्याने चंद्रपूर तालुक्याअंतर्गत चोरगांव, अजयपूर, ऊर्जानगर, गोंडसावरी, चिचपल्ली, चेक निंबाळा, जुनोना, नंदगूर, पिंपळखुट, नागाळा, पदमापूर, बोर्डा, भटाळी, बल्लारपूर तालुक्याअंतर्गत आमडी, आसेगांव, इटोली, कळमना, कवडजई, काटवली बामणी, किन्ही, कोर्टीतुकूम, कोर्टीमक्ता, गिलबिली, नांदगांव पोडे, पळसगांव, बामणी, मानोरा, मोहाडी तुकूम, विसापूर, हडस्ती, पोंभुर्णा तालुक्याअंतर्गत आंबेधानोरा, उमरी पोतदार, केमारा, घनोटी तुकूम, घनोटी नं. 1, सातारा भोसले, मुल तालुक्याअंतर्गत उथळपेठ, गडीसुर्ला, गोवर्धन, जुनसुर्ला, नवेगाव भुजला, पिपरी दिक्षीत, बाबराळा, बोंडाळा खुर्द, बोंडाळा बुज., भवराळा, विरई, सिंतळा या गावांमध्ये पाणंद रस्ते मंजूर करण्यात आले आहे.
नियोजन विभागाच्या रोजगार हमी योजना प्रभागाअंतर्गत या पाणंद रस्त्यांना ३ मार्च २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन करण्यात येणा-या या पाणंद रस्त्यांच्या बांधकामामुळे मजूरांना रोजगार सुध्दा प्राप्त होणार आहे. विशेष बाब या सदराखाली बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात शंभर किलोमीटर पाणंद रस्ते मंजूर केल्याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी रोहयो मंत्री सांदीपान भुमरे यांचे आभार व्यक्त केले आहे.

.jpg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत