डोक्यात सिमेंटचा गट्टू आणि विटा मारून खून
डोक्यात सिमेंटचा गट्टू आणि विटा मारून खून
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नागपूर : कामठी शहरातील विद्यानगर भागात राहणाऱ्या एका ४० वर्षीय इसमाचा अज्ञाताने डोक्यात सिमेंटचा गट्टू आणि विटा मारून खून केल्याची घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. विशाल रामदास सदाफळे (वय ४०) वर्ष असे मयताचे नाव आहे. हा इसम विद्यानगरातील आपल्या बहिणीकडे वास्तव्याला होता. जिल्हा रुग्णालय परिसरात आज सोमवारी सकाळी विशाल दहिफळे याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मिळून आला. घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलीस उपअधिक्षक अबीनाश कुमार, पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, सपोनि. सुधाकर चौरे यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान आणि ठसे पथकालाही पाचारण करण्यात आले. विशालसदाफळे हा इसम मुळचा आमरावती येथील येथील राहणारा असून सातोना येथील एका ढाब्यावर आचारी म्हणून कामाला होता. सदर इसमाच्या मृत्यू मागील नेमके कारण समजु शकले नाही. पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत