तिरुपती विदयालय रेंगोळा /मांगली येथे निरोप समारंभ कार्यक्रम साजरा
तिरुपती विदयालय रेंगोळा /मांगली येथे निरोप समारंभ कार्यक्रम साजरा
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : तिरुपती विदयालय रेंगोळा /मांगली येथे निरोप समारंभ कार्यक्रम साजरा . तिरूपती विद्यालय तथा स्व.निर्धनराव पाटील वाघाये कनिष्ठ कला महाविद्यालय रेंगोळा /मांगली येथे १०,वी १२वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्हि.एन .वाघाये,प्रमुख पाहुणे सौ.पोणीँमाताई फुलेकर ,डी.डी.फटे,एम.एस.सूरसाऊत, आर.पी.मेश्राम, यु.व्हि.माने,जी.पी.धनगर, ए.बी.रंगारी, टि.एस.भैसारे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,वेळेचा सदुपयोग करून जिद्द, प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळत असते विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करावा ,अडचणीवर मात करून जीवनात यशस्वी व्हावे असे विचार व्यक्त केले. यावेळी १०,वी १२वीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचेप्रास्ताविक यु.व्हि.माने यांनी तर संचालन वर्ग ९चा विद्यार्थी मनोज क्षिरसागर याने व आभार लक्ष्मण क्षिरसागर हया विद्यार्थ्यांने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी वर्ग ८,९,११च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.तिरूपती विद्यालय तथा स्व.निर्धनराव पाटील वाघाये कनिष्ठ कला महाविद्यालय रेंगोळा /मांगली येथे १०,वी १२वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्हि.एन .वाघाये,प्रमुख पाहुणे सौ.पोणीँमाताई फुलेकर ,डी.डी.फटे,एम.एस.सूरसाऊत, आर.पी.मेश्राम, यु.व्हि.माने,जी.पी.धनगर, ए.बी.रंगारी, टि.एस.भैसारे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,वेळेचा सदुपयोग करून जिद्द, प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळत असते विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करावा,अडचणीवर मात करून जीवनात यशस्वी व्हावे असे विचार व्यक्त केले. यावेळी १०,वी १२वीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचेप्रास्ताविक यु.व्हि.माने यांनी तर संचालन वर्ग ९चा विद्यार्थी मनोज क्षिरसागर याने व आभार लक्ष्मण क्षिरसागर हया विद्यार्थ्यांने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी वर्ग ८,९,११च्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत