वाहन चालक धडक देऊन घटनास्थळावरून पसार
अपघातात तरुण जागीच ठार
राष्ट्रीय महामार्गावरील बसस्थानकासमोरील घटना
वाहन चालक धडक देऊन घटनास्थळावरून पसार
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी नरेंद्र मेश्राम,भंडारा : आरा मशीनच्या (सॉ मिल च्या) कामावरून घरी परत जात असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी( ता.२५) सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील बसस्थानकासमोर घडली. आदित्य अनमोल गजभिये वय १९ वर्ष रा. मुरमाडी /सावरी असे मृतक तरुणाचे नाव आहे. तो मानेगाव/ सडक येथील आरा मशीन ( सॉ मिल ) मध्ये कामाला होता. आदित्यला धडक देवून वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याने लाखनी पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पसार झालेल्या वाहनचालकाला शोधण्यासाठी शोधकार्य सुरू झाले आहे.
मृतक आदित्य गजभिये हा मानेगाव / सडक येथील आरामशीन (सॉ मिल) मध्ये कामाला होता. रात्र पाळीचे काम आटपून सकाळी ६.३० वाजता च्या सुमारास स्वगावी मुरमाडी /सावरी येथे राष्ट्रीय महामार्गाने बजाज सिटी १०० दुचाकी ( क्रमांक एमएच ३६ एएफ ५१८३ ने घरी परत जात असताना अज्ञात वाहन चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने लापरवाहीने निष्काळजीपणे चालवून आदित्य च्या दुचाकीस मागून धडक दिली यात दुचाकीस्वार आदित्यचा जागीच मृत्यू झाला. तर अज्ञात वाहन चालक घटनेची माहिती पोलिसांना न देता पळून गेला. लाखनी पोलिसांनी अज्ञात वाहन चालक आरोपीविरुध्द अप क्र. २७/२०२२ कलम २७९,३०४(अ) भादवी सहकलम १८४, १३४(ब) मो.वा.का कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पसार झालेल्या वाहनचालकाला शोधण्यासाठी शोधकार्य सुरू केले असून घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल तांबे करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत