भंडारा जिल्हा भाजयुमो तर्फे पवनी तालुक्यातील कोसरा येथे 97 युवकांना रोजगार
भंडारा जिल्हा भाजयुमो तर्फे पवनी तालुक्यातील कोसरा येथे 97 युवकांना रोजगार
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा तर्फे जिल्हाध्यक्ष तिलक वैद्य यांच्या नेतृत्वात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने जिल्हाभर तालुका निहाय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचे ठरविले होते त्या निमित्ताने दिनांक 26 मार्च 2022 ला कोसरा ता.पवनी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
सेक्युरिटी स्किल काँन्सिल ऑफ इंडिया आणि एस आय एस इंडिया लिमिटेड तर्फे सुरक्षा जवान पुरुष पदासाठी मेगा भरती घेण्यात आली. भरती ही भारतीय सुरक्षा दक्षता परिषद नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात आली.
कोरोना महामारी च्या संकटामुळे बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून तरुणांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने एक प्रयत्न भारतीय जनता युवा मोर्चा भंडारा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला. या मेळाव्यात पवनी तालुक्यातील 322 युवक सहभागी झाले, सहभागी झालेल्या युवकांची चाचणी होऊन 97 युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. पुढील ट्रेनिंग करिता भंडारा जिल्ह्यातील पहिली टीम दिनांक 27 मार्च आणि दूसरी टीम 15 एप्रिल ला हैदराबाद साठी रवाना होत आहे.
निर्मलाबाई रत्नपारखी सभागृह कोसरा ता. पवनी येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता.
भाजयुमो जिल्हा अध्यक्ष तिलक वैद्य, भाजपा जिल्हा सचिव धनराज जिभकाटे, भाजपा शहर महामंत्री सुरेश अवसरे,धनराज गभने, भाजयुमो जि. उपाध्यक्ष लोकेश गभने, भाजयुमो जि. उपाध्यक्ष सोनू कोरेकर, भाजयुमो जि. उपाध्यक्ष व युवा वॉरियर्स जिल्हा संयोजक महेंद्र गभने, भाजप कोंढा सर्कल प्रमुख ऍंड.खेमराज जिभकाटे, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष गिरीश नखाते, भाजयुमो ता. सोशल मीडिया प्रमुख राहुल खोब्रागडे,भाजयुमो जि. कार्य. सदस्य विकास जिभकाटे, भरती अधिकारी रोशनलाल सिंग निखिल कटरे,वासेळा सरपंच किशोर ब्राह्मणकर,भाजयुमो जि. सचिव चेतन पडोळे,पिंपळगाव भाजप सर्कल प्रमुख दिनेश कोरे,संजय रत्नपारखी,शुभम भुरे, अभिषेक रत्नपारखी, निखिल शेंडे, अंकित अंबादे, वसंता गंथाळे, अखिल मुंडले,अशिक रामटेके,आणि स्थानिक युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत