पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित 19 गावे अंधारात त्वरिल पुरवठा करा : चद्रंशेखर टेंभुर्णे
पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित 19 गावे अंधारात त्वरिल पुरवठा करा : चद्रंशेखर टेंभुर्णे
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम,भंडारा : लाखांदूर तालुक्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात असलेल्या पथदिव्यांच्या नियमित वीज बिलाचा गत एप्रिल ते फेब्रुवारी पर्यंत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने भरणा केला नाही. लाखांदूर येथील वीज कंपनीचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी कारवाई करीत व दिव्याचा वीजपुरवठा खंडित केल्या त्यामुळे तालुक्यातील 19 गाव अंधारात आहे त ही माहिती लाखांदूर वीज कंपनी उप अभियंता कार्यालय अंतर्गत देण्यात आली आहे.
लाखांदूर तालुक्यात एकूण 62 ग्रामपंचायत आहेत .त्यामध्ये एकूण 103 पथदिव्यांची जोडणी असल्याची माहिती आहे ,तथापि ही जोडणी असलेल्या पथदिव्यांची गत एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत एकूण ८ लाख रुपयाचा नियमित वीजबिल थकीत आहे.
दरम्यान तालुक्यातील नियमित वीज बिल थकीत दार ग्रामपंचायतला वीजबिल भरणा करण्याचे निर्देश देऊनही वीज बिलाचा भरणा न केल्याने लाखांदूर येथील कंपनीचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील एकूण १९ गावातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केल्याने या गावात अंधार पसरला आहे.
दरम्यान गत एc022 पर्यंत तालुक्यातील एकूण 62 ग्रामपंचायत अंतर्गत एकूण आठ लाख रुपयांचा नियमित वीजबिल थकीत आहे. वीज कंपनीने केलेल्या कारवाईत 19 गावातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या 19 गावातील ग्रामपंचायती अंतर्गत एकूण 1 लाख 27 हजार रुपयाचा वीजबिल थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तथापि पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्रामपंचायतीमध्ये विरली खुर्द, खैरना, सोनेगाव , तई खुर्द, हर्दोली ,तिरखुरी, घ़ोडेझरी पेंढारी,पालेपेढरी, पारडी, मुरझा, चिचाळ, चिकना, पाऊळदवना, कोदामेढी, परसोडी, तई बु, बोलली,व धर्मापुरी, आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
लाखांदूर तालुक्यातील विविध गावातील एकूण ६९ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे, तथापि या योजनेअंतर्गत मागील गत एप्रिल महिन्यापासून ते सध्याच्या मार्च पर्यंत एकूण 27 लाख 88 हजार रुपयांचा नियमित वीज बिल थकीत आहे त्यानुसार येत्या काही दिवसात या वीज बिल थकीत दार ग्रामपंचायतीने वीज बिलाचा भरणा न केल्याने, पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.खडिंत केलेला वीज पुरवठा त्वरित सुरू करा अन्यथा तीव्र आदोंंलन करण्याचा इशारा माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुणे यांनी दिलाआहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत