रस्त्याने पायदळ जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न
रस्त्याने पायदळ जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न
वंधली येथील घटना
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, खेमचंद नेरकर,वरोरा : तालुक्यातील वंधली येथे आज सायंकाळी सात वाजता शौचालयावरून परत येत असताना माढेळी येथील नंदू माहूरे (वय 27) नामक व्यक्तीने सदर महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असून जाणाऱ्या काही व्यक्तीच्या लक्षात येताच त्याला लगेच गावकऱ्यांनी पकडले व चांगला चोप दिला असल्याचे कळते. आरोपी मद्य प्राशन केले असल्याचे समजते.पोलिसांना पोलीस पाटलांनी तक्रार करून पाचारण केले असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले व संबंधित आरोपीला पकडून वरोरा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले आहे. सदर घटनेची पुढील चौकशी पोलीस उपनिरीक्षक किटे हे करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत