Breaking News

भंडाऱ्यातील नाकाबंदीत दोघांना तलवारींसह अटक

भंडाऱ्यातील नाकाबंदीत दोघांना तलवारींसह अटक


महा घडामोडी न्यूज नेटवर्क, भंडारा :
चारचाकी वाहनात तलवारी घेऊन फिरत असलेल्या इसमांना भंडारा पोलिसांनी रात्री नाकाबंदी दरम्यान अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव सत्यजित मनोहर गजभिये व मनोज हिराचंद मेश्राम सांगितले जात आहे. दोघे रामटेक येथील रहिवासी आहेत. तलवारी वेळीच सापडल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रात्री दरम्यान भंडारा येथील शास्त्री चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या वेळेस वरठीकडून बीट्स चारचाकी क्रमांक MH 14 BX 9034 ही संशयास्पद येताना आढळली. नाकाबंदी करीत असलेल्या पोलिसांनी गाडी अडवून विचारपूस केली. गाडीत असलेले दोघे घाबरत असल्याचे लक्ष्यात आले.


गाडीची झडती घेण्यात आली. मागील सीटखाली एक मोठी व एक लहान अश्या दोन तलवारी आढळल्या. पोलिसांनी सत्यजित मनोहर गजभिये व मनोज हिराचंद मेश्राम यांना अटक केली. गाडी व तलवारी जप्त केल्या आहेत. पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे की, दोघे एखादा मोठा गुन्हा करायला जात असावेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांनी दिली. आता पोलीस आरोपींचा कसून तपास करत आहेत. ते नेमके तलावारी घेऊन कुठे जात होते, हे शोधणे गरजेचे आहे. या तलवारींचा दुरुपयोग कसा केला जाणार होता, याची शहानिशा केली जात आहे.



दुसऱ्या घटनेत, वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्याच्या बाभुळगाव येथे मालवाहू चारचाकी वाहन पुलाखाली कोसळली. या वाहनात 13 प्रवासी होते. यातील एका महिलेचा मृत्यू झाला तर 12 प्रवासी जखमी झाले. नागपूर जिल्ह्याच्या वाकी येथून दर्शन घेऊन प्रवासी येत होते. जखमीमध्ये दोन वर्षाच्या मुलीचा सुद्धा सहभाग आहे. नागरिकांसह पोलिसांनी दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले. वाघाडी नदीच्या पुलावरून वाहन खाली कोसळले. सर्व जखमींना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलवल्याची माहिती आहे. मृतक आणि जखमी हे देवळी तालुक्याच्या पळसगाव येथील आहेत. सेलू पोलिसांत चारचाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत