ग्रामवासियानी गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करा -आमदार चंद्रिकापुरे
ग्रामवासियानी गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करा -आमदार चंद्रिकापुरे
रासेयो शिबिराचे उद्घाटनप्रसंगी मौजा खामखुरा येथे प्रतिपादन
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,संतोष रोकडे,गोंदिया : शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयातील अर्जुनी/मोर. च्या राष्ट्रीय सेवा योजना विंभागाच्या वतीने मौजा खामखुरा येथे सात दिवसीय निवासी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी उद्घाटक म्हणून अर्जुनी-मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री मनोहर चंद्रिकापुरे उपस्थित होते. दिनांक 19 मार्च ते 25 मार्च 2022 या कालावधीत मौजा खामखुरा येथे समृध्द भारताकरिता लोकजागृती या संकल्पनेवर आधारित रासेयोचे शिबीर संपन्न होत आहे. श्री दुर्गा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री लुणकरणजी चितलांगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव श्री मुकेशजी जयस्वाल, सहसचिव श्री नामदेवराव कापगते, जि.प.सदस्य सौ. पौर्णिमाताई ढेंगे,पंचायत समिती सदस्य सौ. भाग्यश्री सयाम, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री लोकपाल गाहाणे, खामखुरा ग्रामपंचायतचे सरपंच श्री अजय अंबादे, उपसरपंच श्री धनंजय दूनेदार,पोलीस पाटील श्री जयप्रकाश लाडे, म.गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री ओमेश्वर संग्रामे, सर्व ग्राम पंचायत सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ईश्वर मोहूर्ले, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. मोतीलाल दर्वे, डॉ. प्रदीप भानसे, डॉ के जे सिबी उपस्थित होते. कार्यक्रमांचे प्रास्तविक डॉ मोतीलाल दर्वे यानी तर संचालन प्रा. लक्ष्मीकांत कापगते यानी केले. आभारप्रदर्शन डॉ. प्रदीप भानसे यानी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत