Breaking News

क्षिक्षण ही काळाची गरज मा. आमदार जवळगांवकर

क्षिक्षण ही काळाची गरज मा.आमदार जवळगांवकर


महा घडामोडी न्युज नेटवर्क,जळगाव : पूर्वीच्या काळी समाजातील अंधश्रद्धेमुळे व संकुचित मानसिकतेमुळे मुलींच्या शिक्षणावर बंदी होती.मुलींना शिक्षण मिळावे यासाठी महात्मा फुले यांनी पुण्याला मुलींची पहीली शाळा उघडून सावित्रीबाई फुले यांना पहीली स्री शिक्षिका होण्याचा मान मिळवून दिला.शिक्षणामुळे मानव सुसंस्कृत बनतो.

        मूळ डोंगरगांव ता.हदगांव येथील शिवाजी वाढवे यांच्याकडे मजुरी करुन संसाराचा गाडा चालविणे यापलीकडे उदरनिर्वाहासाठी दुसरा कोणताही पर्याय नव्हता.त्यामुळे त्यांनी कामाच्या शोधात सर्व कुटुंबासह नांदेड येथे स्थलांतर केले.त्यांनी एका प्रशालेमध्ये सुरक्षा गार्डची नौकरी करीत आपल्या मुलांचे हलाकीच्या परिस्थितही शिक्षण चालूच ठेवले.कु.तृप्ती ही शिक्षणामध्ये उपजत हुषार.तिने आपल्या शिक्षणात सातत्य ठेवल्याने तिचा एमबीबीएसला नंबर लागला.परंतु प्रवेश शुल्क भरण्यासाठी एकही रुपया नव्हता.ही बातमी आशादीपला डाॅ.निळे यांच्याकडून कळाली. निळे परीवाराच्या लग्नसमारंभामध्ये ही मदत देण्याचे जाहीर करताच मा.आमदार जवळगांवकर यांनीही तात्काळ रोखीने रु.एकविस हजाराची शैक्षणिक मदत करुन शैक्षणिक कार्यात आपला सहभाग नोंदवित मुलीच्या शिक्षणात कुठलीही अडचण येणार नाही याची ग्वाही दिली. ही शैक्षणिक मदत मा.आमदार माधवराव पाटील जवळगांवकर व बाबुराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

       यावेळी मा.आमदार माधवराव जवळगांवकर,लोकनेते बाबुराव पाटील कोहळीकर,सामाजिक कार्यकर्ते,आशादीपचे डाॅ.भगवान निळे,हरिश्चंद्र चिल्लोरे,प्रभाकर दहीभाते व राजकीय मंडळी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत