बोरटोला येथे तलाव खोलीकरन कामाचे भूमिपूजन
बोरटोला येथे तलाव खोलीकरन कामाचे भूमिपूजन
गोंदिया : तालुक्यातील बोरटोला येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत चार लाख पन्नास हजार रुपयांच्या तलाव खोलीकरण कामाची सुरुवात करण्यात आली.
ग्रामपंचायत बोरटोला अंतर्गत इंजोरी येथील भूतबोडी तलाव खोलीकरण कामाचा शुभारंभ जि प सदस्य लाईक राम भंडारे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प.स. सदस्य संदीप कापगते, कुंदा लोगडे ,उपसरपंच काशिनाथ कापसे ,गीता नारनवरे, प्रेमलाल नारनवरे, राजकुमार मेंढे ,सुरेश ब्राह्मणकर उपस्थित होते.रोहयोअंतर्गत 205 नोंदणीकृत मजुरांना या कामामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.75 पुरुष आणि 130 स्त्रिया कामगार या कामावर आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत