पाणीपुरवठा योजनेची वीज खंडीत
पाणीपुरवठा योजनेची वीज खंडीत
लाखांदूर तालुक्यातील चार गावांत पिण्याच्या पाण्याचे संकट
(महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी) नरेंद्र मेश्राम,भंडारा : लाखांदूर ग्रामपंचायत क्षेत्रातील स्थानिक नागरिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी कराचा भरणा न केल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने या योजनेच्या वीज बिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे लाखांदूर येथील वीज कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला .तालुक्यातील चार गावात पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे.
लाखांदूर तालुक्यात विविध ग्रामपंचायत क्षेत्रात पाणी पुरवठा योजनेअंतर्गत लाखो रुपयांचे वीजबिल थकीत असल्याची माहिती आहे.
स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांना पाणीपुरवठा योजना अंतर्गत पाणी कराचा भरणा करण्याचे आव्हान करून देखील नागरिकाकडून पर्याप्त स्वरूपात पाणी कराचा भरणा केला जात नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपुरवठा योजनेच्या वीजबिलाचा भरणा करण्यात विविध समस्या निर्माण होत असल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, वीज कंपनीने थकीत दार व नियमित वीज बिल न केलेल्या तालुक्यातील कुडेगाव, रोहनी, धर्मापुरी ,व दांडेगाव आधी ४ गावातील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्याची माहिती देण्यात आली आहे.
या स्थितीत या ४ गावातील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध बोरवेल वर गर्दी दिसून येत आहे .दरम्यान वीज बिलाचा भरणा करण्याकरिता नागरिकांनी पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी कराचा भरणा करणे अनिवार्य असल्याची माहिती देण्यात आली आहे.
अध्या पही 25% देयक थकित ग्रामपंचायत क्षेत्रातील पथदिव्यांच्या नियमित वीज बिल अंतर्गत डिसेंबर पर्यंत जवळपास 75 टक्के राशीचा विज बिल शासनाने भरणा केला आहे. अजूनही 25 टक्के वीज बिल थकीत आहे .तथापि वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पथदिव्यांच्या थकित वीज बिलाची वसुली करण्याचे निर्देश निर्गमित केले आहेत, येत्या काही दिवसात विज बिलांचा भरणा न झाल्यास पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत