धानाचे चुकारे ३० मार्चपर्यंत मिळणार !
धानाचे चुकारे ३० मार्चपर्यंत मिळणार !
आ चंद्रिकापुरे यांच्या मध्यस्थीने उपोषणाची सांगता
महा घड़ामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, संतोष रोकड़े,गोंदिया : नवेगावबांधच्या आदिवासी विकास उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या उपोषण मंडपाला रविवारी आ मनोहर चंद्रिकापुरे यांनी भेट दिली.आ चंद्रिकापुरे यांनी नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळाच्या महाप्रबंधकांशी चर्चा केली.३० मार्चपर्यंत धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार असल्याचे महाप्रबंधकांनी आश्वस्त केल्यानंतर उपोषणाची सांगता झाली.
धान खरेदीत झालेल्या अनियमिततेची चौकशी करावी, धानाचे चुकारे त्वरित देण्यात यावे व पीक कर्ज भरण्यास शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात यावी या मागण्यांसाठी नवेगावबांध येथील आदिवासी विकास उपप्रादेशिक कार्यालयासमोर शेतकरी आमरण उपोषणाला बसले.आ चंद्रिकापुरे यांनी रविवारी उपोषण मंडपाला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.शेतकऱ्यांची समजूत घालून नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा केली.त्यांनी ३० मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात धान चुकाऱ्याचे पैसे जमा केले जाणार असल्याचे आश्वस्त केले.त्यानंतर आ चंद्रिकापुरे यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना लिंबूपाणी पाजून उपोषणाची सांगता केली.
यावेळी सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉ अविनाश काशिवार,गजानन परशुरामकर, पं स सदस्य होमराज पुस्तोडे,माजी तालुकाध्यक्ष नामदेव डोंगरवार व शेतकरी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत