Breaking News

कोल्हापूर उत्तर च्या जनतेने नॅशनल सोशालिस्ट पार्टी चा उमेदवार यशवंतराव शेळके यांना विधानसभेत पाठवावे

कोल्हापूर उत्तर च्या जनतेने नॅशनल सोशालिस्ट पार्टी चा उमेदवार यशवंतराव शेळके यांना विधानसभेत पाठवावे - पक्ष प्रवक्ते पियूष पाटील यांचे आवाहन



महा घडामोडी न्यूज नेटवर्क कोल्हापूर ;  दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर ची जागा रिक्त झाली होती आणि त्या जागेची पोटनिवडणुकीसाठी नॅशनल सोशालिस्ट पार्टी कडून यशवंत शेळके ही निवडणूक लढवत आहेत . नॅशनल सोशालिस्ट पार्टी हा पक्ष लोकांनीं लोकांसाठीच चालवलेला लोकांचा पक्ष आहे .. व्यवस्था परिवर्तन आणि स्वदेशी चे आत्मसात करणे ह्या व्यापक भूमिका घेवुन हा पक्ष आपले अस्तित्व भ्रष्टाचारी पक्षाशी लढा देत आपले अस्तित्व राजकीय पटलावर आजमावून पाहत आहे तरी लोकांनी साथ द्यावी अशी हाक नॅशनल सोशालिस्ट पार्टी चे पक्ष प्रवक्ते पियूष पाटील यांनी जनतेला दिली आहे.

सर्वसामान्यांचे प्रश्न आणि नॅशनल सोशालिस्ट पार्टी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तरी कोल्हापूर ची स्वाभिमानी जनता नॅशनल सोशालिस्ट पार्टी चे उमेदवार यशवंत शेळके यांना साथ देतील असा विश्वास पक्ष प्रवक्ते पियूष पाटील यांनी  व्यक्त केला. नॅशनल पार्टीने कोल्हापुरातून मराठा आरक्षणासाठी पहिले राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यासाठी तावडे हॉटेल चौकात धनगर व मराठा आरक्षणासाठी संयुक्त रास्ता रोको आंदोलन केले तसेच कोरोणा  काळात सामाजिक बांधिलकी जपत  जीवनावश्यक वस्तू चे वाटप  दोनशे कुटुंबांना केले त्याचबरोबर पोलीस प्रशासन सरकारी दवाखाने या ठिकाणी मास्क, सनिटाइजर  त्याचे वाटप केले कोरोना काळात मोलमजुरी करून जगणाऱ्या लोकांसाठी विज बिल माफी साठी धरणे आंदोलन केले एकंदरीत हा पक्ष सर्वसामान्यांचा आहे इथे कोणीच चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलं नाही सर्व पदाधिकारी पक्ष च लोकांनी लोकांसाठी चालवलेला सर्वसामान्यांचा पक्ष आहे तरी यशवंतराव शेळके यांना कोल्हापूर उत्तर च्या जनतेने साथ द्यावी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत