Breaking News

गौरनगर येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सीएसआर इनिशिएटिव्ह अंतर्गत शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन 


भंडारा जिल्हा प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम ;
भंडारा या शिबीराचे उद्घाटन माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी भाजप जिल्हा परिषद गटनेते लायकराम भेंडारकर,जिल्हा परिषद सदस्य .जयश्रीताई देशमुख, पंचायत समिती सदस्य डाॅ.नाजुक कुंभरे, प्रमोद लांडगे, .रघुनाथ लांजेवार, डॉ.गजानन डोंगरवार, व्यंकट खोब्रागडे, एस. आर. देशमुख, मुरलीधर ठाकरे, सरपंच वंदना अधिकारी, उपसरपंच बिकास वैद्ये उपस्थित होते. सदर शिबीर अंतर्गत मोफत हिमोग्लोबीन, मधुमेह, रक्तदाब तपासणी, वजन व मोफत वैदय, छाती विशेषतज्ञ (क्षयरोग), सामान्य फिजिशियन, आर्थोपेडिक, बालरोगसंबंधी मार्गदर्शन यांचा समावेश करण्यात आला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत