ओबीसी आरक्षणावरून मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय
ओबीसी आरक्षणावरून मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण निर्णय
नागपूर : ओबीसी आरक्षणाला घेऊन राज्यात वादंग निर्माण झाला आहे.. सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाचा अहवाल फेटाळल्यानंतर राज्य मंत्रीमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेऊ नयेत, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमुखाने घेण्यात आला आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घ्यायच्या नाहीत, असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न यामुळे राज्यात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत