कोळसा भरून जाणारा ट्रक पलटला 1 जखमी
कोळसा भरून जाणारा ट्रक पलटला 1 जखमी
लाखनी येथील सिंधीलाईन चौकातील घटना
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम,भंडारा, लाखनी :- दगडी कोळसा भरून भरधाव वेगाने जाणार्या ट्रकच्या चेसीसचा अँगल तुटल्याने ट्रक अनियंत्रित होऊन राष्ट्रीय महामार्गावरील सिंधीलाईन चौकात पलटल्याची घटना 1 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडुन चालक जखमी झाला त्याचे नांव कळु शकले नाही.
भंडारा कडुन साकोली कडे कोळसा भरून भरधाव वेगाने जाणारा ट्रक क्र. टि एन 52 एल 4442 मध्ये बिघाड झाल्याने चालकाचे ट्कवरील नियंत्रण सुटून अनियंत्रित झाल्याने शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील सिंधीलाईन चौकातील सर्व्हिस रोड वर पलटला. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे नगण्य रहदारी होती त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी ट्रक चालक जखमी होऊन ट्रकचे प्रचंड नुकसान झाले आहे. जखमी ट्रक चालकास ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. वृत लिहीपर्यंत लाखनी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली नव्हती


कोणत्याही टिप्पण्या नाहीत