सर्व धर्मांत महिलांना मानाचे स्थान आहे, तिला विविध देशांत लढा द्यावा - मिनाताई राहिंज
महा घडामोडी न्यूज नेटवर्क अहमदनगर : 8 मार्च आज जागतिक महिला दिन. सर्व धर्मांत महिलांना मानाचे स्थान आहे. आई , बहिण , बायको , मुलगी अशा भुमिका महिला साकारते परंतू तिला विविध देशांत लढा द्यावा लागला . यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्यांचे स्मरण म्हणजे महिला दिन. भारतात कायद्याने महिलांना सन्मान दिला. या देशांची महिला पंतप्रधान होती , राष्ट्रपती होती आजही केंद्रातील आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल सोनिया गांधींच्या रुपाने महिलांच्या हाती आहे . अशी 33 टक्के नंतर 50 टक्के (खऱ्या अर्थाने 100 टक्के) आरक्षण महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत मिळाले 100 टक्के म्हणण्याचे कारण म्हणजे महिला आरक्षण व्यतीरिक्त सर्व साधारण जागेवरही पुरुषांच्या विरोधात महिला निवडणूक लढवू शकते , लष्करातही महिला भरती होत आहे. निवडणूकीत तिकीट मिळविता मिळविता एस.टी. बसमध्ये तिकीटही देताना दिसते , तर क्रिकेट संघातही विकेट घेताना दिसते , महिलांच्या या प्रगतीत तालुक्यातील राजकीय , बचत गट , महिला मंडळ आदी माध्यमातून कार्याच्या ठसा उमटवलेल्या व महिलांची यशोगाथा व त्यांना मिळालेली प्रेरणा त्यांचे ध्येय याबाबत विविध महिला नेत्यांशी आमच्या प्रतिनिधी सौ मिनाताई राहिंज यांनी घेतलेला आढावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत