खासदार क्रिडा महोत्सव अंतर्गत आयोजित सिल्लीचा पट ठरला पर्वणी
महोत्सवात पहिल्यांदाच सहभागी बैलांच्या शंकर पटाने ग्रामीण भागात प्रचंड उत्साहाचे वातावरण
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : खासदार क्रीडा महोत्सवात पहिल्यांदाच सहभागी करून घेण्यात आलेल्या बैलांच्या शंकर पटाने ग्रामीण भागात प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. आज सिल्ली येथील शंकर पट आनंद घेण्यासाठी अभूतपूर्व गर्दी लोटली होती. बऱ्याच वर्षानंतर झालेले पटाचे आयोजन ग्रामीण भागासाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरली.
या महोत्सवाच्या निमित्ताने पहिल्यांदाच शंकर पट क्रीडा महोत्सवाचा भाग झाला. अन्य खेळांप्रमाणे अस्सल ग्रामीण असलेल्या शंकर पटाला क्रीडा महोत्सवात जागा मिळवून देत त्याचा सन्मान वाढविण्याचे काम खासदार सुनील मेंढे यांनी केले. पटावरील उठलेली बंदी आणि क्रीडा महोत्सवात झालेला सहभाग यामुळे क्रीडाप्रेमी मध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहेत.
१५० वर्षाची परंपरा असलेला सिल्ली येथील शंकर पटही आज भरला. ९२ बैलजोड्यांसह सहभागी झालेल्या कातकऱ्यांसोबतच पट पाहण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये प्रचंड उत्साह ओसंडून वाहताना दिसला. एखादा यात्रे प्रमाणे या ठिकाणी गर्दी झाली होती. खासदार सुनील मेंढे ही स्पर्धा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. सोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, महामंत्री चैतन्य उमाळकर, रामदासजी शहारे, प्रशांत खोब्रागडे, जि. प. सदस्य .विनोद बांते, .मयूर बिसेन, विकास मदनकर, रोशन काटेखाये, प्रशांत निबोळकर, सचिन कुंभलकर, प्रवीण गभने, अतुल वैरागडकर, माला बगमारे, .रोशनी पडोळे, वनिता कुथे,. गिता सिडाम, मंजिरी पनवेलकर, झाशी गभने व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत