Breaking News

रात्रीच्या अंधारात चार पोलिसांचा हॉस्टेलमध्ये शिरकाव; त्यानंतर केलं 'ते' अमानुष कृत्य

रात्रीच्या अंधारात चार पोलिसांचा हॉस्टेलमध्ये शिरकाव; त्यानंतर केलं 'ते' अमानुष कृत्य

या घटनेचे पडसाद राज्यभर उमटायला सुरुवात झाली असून राज्यातील शिरवळ, मुंबई,नागपूर, परभणी आणि उदगीर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन करत संप पुकारला आहे.



महा घडामोडी न्यूज नेटवर्क,सातारा : शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याना चार पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. रात्रीच्या वेळी वसतिगृहात घुसून लाठीकाठ्यानी 17 विद्यार्थ्याना ही बेदम आणि अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटायला सुरुवात झाली असून राज्यातील शिरवळ, मुंबई,नागपूर, परभणी आणि उदगीर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन करत संप पुकारला आहे. 

1- 9 मार्चला शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान 4 पोलिस आले आणि त्यांनी या वसतिगृहातील दरवाजावर लाथा मारत खोलीत घुसून मारहाण करायला सुरुवात केली.विद्यार्थी कारण विचारात होते मात्र कोणतेही कारण न देता ही मारहाण केली गेल्याचे विद्यार्थ्यांचे सांगणे आहे.या वस्तीगृहाच्या बाजूला असणाऱ्या एका अपार्टमेंट मधून या वसतिगृहातील मुलांबाबत तक्रारी आल्याचे पोलिसांचे सांगणे आहे.

या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी केली जाणार आहे आता प्राथमिक चौकशी करून संबंधित चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत