कमरगांव येथे स्वतंत्रता संग्राम सेनानी विरांगना राणी अवंतीबाई लोधी यांचा बलिदान दिवस साजरा
कमरगांव येथे स्वतंत्रता संग्राम सेनानी विरांगना राणी अवंतीबाई लोधी यांचा बलिदान दिवस साजरा
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : ग्राम कमरगांव येथे सन १८५७ ची स्वतंत्रता संग्राम सेनानी विरांगना राणी अवंतीबाई लोधी यांचा 164 व्या बलिदान दिवसाच्या निमित्ताने अमर शाहिद विरांगना महाराणी अंवतीबाई लोधी यांची प्रतिमा अनावरण दिनांक-20 मार्च 2022 रोज रविवारला शोभा यात्रा काढून उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष लोधी विरांगणा राणी अवंतीबाई वंशजडोलेन्द्रसिंह , उपाध्यक्ष लोधी विरांगणा राणी अवंतीबाई वंशज होशियारसिंह , उद्घाटक डीप्टी कमिशनर जीएसटी भोपाल लोकेश लिल्हारे, दिपप्रज्वलन आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे,.जि.प.सदस्य डॉ. लक्ष्मण भगत, भूमीदान दाता ओंकारलाल नागपुरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी जि.प.सदस्य डॉ. लक्ष्मण भगत म्हणाले, राणी अवंतीबाई लोधी यांनी देशाचे पहिले स्वातंत्र्य सेनानी आणि आदरणीय महिलेचा लढा दिला. सर्व प्रथम ब्रिटीशाविरुद्ध तलवार हाती घेतली. विरांगना अवंतीबाईनी संपूर्ण देशात क्रांतिकारक महिला म्हणून ओळख निर्माण केली.एवढेच नव्हे तर स्वातंत्र्य संग्रामात सशस्त्र क्रांतीचा पाया त्यांनीच रोवला होता. आजच्या काळात राणी अवंतीबाई यांची विरकथा केवळ महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही प्रेरणादायी आहे. वीरांगना अवंतीबाई केवळ बालपणीच एक नायक आणि पराक्रमी होत्या. राजा राजकुमार सिंह यांच्या मृत्यूनंतर महाराणी अवंतीबाई लोधी यांनी लढा आपल्या हातात घेतला. १८५७ च्या काळात स्वातंत्र्य आंदोलन सुरू केले, अवंतीबाईनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रणभूमीवर लढल्या. त्यात त्या अमर शहीद झाल्या. राणी अवंतीबाई केवळ लोधी समाजाच्या ओबीसी महिला नव्हे तर स्वतंत्र भारताचा गौरव असल्याचे प्रतिपादन जि.प.सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत