धानाच्या बोनस करीता भाजप किसान आघाडीचा निषेध प्रदर्शन
धानाच्या बोनस करीता भाजप किसान आघाडीचा निषेध प्रदर्शन
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम,भंडारा : राज्य सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस नाकारून जो शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे त्याच्या निषेधार्थ भाजप किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार शिशुपाल पटले, जिल्हा अध्यक्ष शिवराम गिहेपुंजे,किसन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष डॉ. हरेंद्र राहांगडाले यांचे नेतृत्वात उद्या 25 मार्च ला दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शासकीय हमी भावात धान विकणे परवडत नसल्याने भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांना बोनस सुरु केला होता.मात्र राज्यातील आघाडी सरकारने बोनस चा लाभ प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे बनावट कारण पुढे करून बोनस बंद केला.आमदार निधीत वाढ करायला व इतर अनावश्यक खर्च करायला सरकार जवळ पैसा आहे,मात्र शेतकऱ्यांना द्यायला नाही का?असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.अर्थमंत्र्यांनी 600 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना देऊ अशी घोषणा केली मात्र ती कशी ,किती व कोणाला देणार हे स्पष्ट केले नाही. आर्थिक घोटाळ्याच्या दलदलीत सापडलेल्या सरकारला शेतकऱ्यांना आर्थिक मदत करायची नाही, म्हणूनच राज्यातील आघाडी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी भाजप किसान आघाडी तर्फे निषेध प्रदर्शन करण्यात येणार आहे. जिल्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ हरेंद्र रहांगडाले यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत