मुलगी मुलापेक्षा कमी नाही - आनंद मलेवार
मुलगी मुलापेक्षा कमी नाही - आनंद मलेवार
महा घड़ामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, नरेंद्र मेश्राम,भंडारा : मोहाडी तालुक्यातील खमारी बु येथील कुमारी प्रतिमा हरदे या मुलीने देशाच्या रक्षणासाठी बीएसएफ फोर्स सैन्यदलात ट्रेनिंग पूर्ण करून आजच्या नवीन तरुण मुलांना मुलगी मुला पेक्षा कमी नाही हे दाखवून दिले. एकीकडे मुलीसाठी चूल आणि मूल अशी गैरसमज पसरत होती मुली डॉक्टर कलेक्टर वकील टीचर अशा भरपूर झाल्या परंतु आपल्या समाजातील आपल्या क्षेत्रातील या मुलींनी जो धाडस दाखविला चक्क भारत मातेच्या रक्षणासाठी बीएसएफ फॉर्स जॉईंट करून या क्षेत्रातील मुलींसाठी एक ए नवी प्रेरणा दिली की मुलगी मुला पेक्षा कमी नाही असे मत या क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य आनंद मलेवार यांनी त्यांच्या गृही भेट देऊन तिचे अभिनंदन केले सोबत या क्षेत्राचे पंचायत समिती सदस्य बानाभाऊ सव्वालाखे तारेद्र दमाहे कुमारी प्रतिमा हरदे यांचे आई-वडील इतर गावकरी उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत