बचतगट व बचत गटाच्या माध्यमातून स्थापित ग्राम संघातून महिलांनी सर्वांगिन विकास साधावा
बचतगट व बचत गटाच्या माध्यमातून स्थापित ग्राम संघातून महिलांनी सर्वांगिन विकास साधावा
पत्रकार संतोष रोकडे यांचे प्रतिपादन
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधि,संतोष रोकड़े,गोंदिया : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोन्नती अभियानांतर्गत गावागावात बचत गट स्थापन करण्यात आलेले आहेत व अनेक गटांचे मिळून ग्राम संघ स्थापन करण्यात आलेले आहेत या बचत गट व ग्रामसंघ यांच्या माध्यमातून बचत गटात समाविष्ट असलेल्या महिलांनी अभियानाअंतर्गत असलेल्या विविध योजना राबवून रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करून स्वतःचा तसेच पर्यायाने समाजाचा सर्वांगीण विकास साधावा असे प्रतिपादन पत्रकार संतोष रोकडे यांनी केले ते दिनांक 20 मार्च रोजी इट खेडा येथे रमाई ग्राम संघाच्या वार्षिक सभा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून ग्रामपंचायत सदस्य सौ कल्पना लोणारे तर प्रमुख अतिथी म्हणून अंगणवाडी सेविका सौ ममता मैद अंगणवाडी सेविका सौ लोपा कांबळी आशा सेविका उषा मडावी प्रतिभा ग्राम संघाच्या सचिव सौ इंद्रवता सुखदेवे यशोदा बचत गट अध्यक्ष ताराबाई वैद्य प्रतिभा ग्रामसंघ अध्यक्ष प्रीती रंगारी कोषाध्यक्ष देवकन्या लोणारे समता ग्रामसंघ सचिव नलिनी भावे अंगणवाडी सेविका लीनता गिरेपुंजे आशा सेविका रंजू राजगडे इंदिरा मिसार कृषी सखी सौ रीमा येरणे रमाई ग्राम संघाचे अध्यक्ष सौ राजूबाई बेदरे सचिव सौ वैशाली जिरित्कार कोषाध्यक्ष सौ वर्षा घोरमोडे व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सौ डोंगरे यांनी रमाई ग्राम संघात 19 बचत गट समाविष्ट असून ग्राम संघाला मिळालेल्या निधीचे वाचन केले तसेच रमाई ग्राम ग्राम संघाच्या प्रगतीवर प्रकाशझोत टाकला यावेळी उपस्थितांनी मान्यवरांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे औचित्य साधून लहान लहान बालकांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमाई ग्राम संघात समाविष्ट असलेल्या तसेच इतर महिलांनी सहकार्य केले,



कोणत्याही टिप्पण्या नाहीत