सतसंगामुळे गावातील वातावरण प्रशन्न होवुन मनाला शांती मिळते :- जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर
सतसंगामुळे गावातील वातावरण प्रशन्न होवुन मनाला शांती मिळते :- जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर
इंजोरी येथे श्रीमद भागवत सप्ताह प्रारंभ
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी संतोष रोकडे,गोंदिया, अर्जुनी मोर : गावात होणारे भागवत सप्ताह मानवी मनाला ऊर्जा देणारे असते. सात दिवसीय सतसंगामुळे गावात धार्मिक वातावरण तयार होवुन भक्तीचा सुगंध दरवळत असतो.मानवी मनाला सुखद आनंद देणारे प्रवचन यावेळी ऐकायला मिळते. याच भागवत सप्ताहात दृष्ट प्रवृत्तीचा त्याग करुन व भगवंताला साक्षी मानुन चांगले विचार अंगीकृत करण्याची ईच्छा जागृत होते. व एकीची भावना निर्माण होवुन गावात शांतता व सुबत्ता नांदते.त्यामुळे गावक-यांनी या भागवत सप्ताहातुन ज्ञान प्राप्त करुन आपले जिवन साफल्य करावे असे आवाहन जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर यांनी केले.
श्री संत तुकाराम महाराज बिजोत्सवानिमीत्य तालुक्यातील इंजोरी येथे आयोजित श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहानिमीत्त आयोजित ( ता.१९ )उदघाटनिय कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी भागवत प्रवचनकार हभप कैलास वाघाये महाराज, हभप शामसुंदर महाराज,हभप मंगलमुर्ती महाराज, लालाजी शिवनकर, दिपंकर उके, पोलीस पाटील डाकराम मेंढे, युनाथ मेश्राम, मोरेश्वर मेश्राम, दिलीप हुकरे, राधेश्याम हुकरे, सुरज तवाडे,अरुण मेंढे, टेकराम फुंडे, मोहण भेंडारकर, ललीत हेमणे, वनिता मेश्राम, सतीश शिवणकर, व अन्य गावकरी उपस्थित होते.
दि.१९ मार्च ते २५ मार्च पर्यंत चालणा-या या भागवत सप्ताहात प्रवचनकार हभप कैलास वाघाये महाराज आपल्या अमृतवाणीतुन भक्तीचा सुगंधातुन ग्रामवासीयांना मंत्रमुग्ध करणार आहेत.या भागवत सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहनही आयोजकातर्फे करण्यात आले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत