अर्जुनी/मोर.तालुका युवक कांग्रेस याच्या द्वारा केलेल्या रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश,
तावशी बायपास रस्त्याच्या कामाला मिळाली मंजुरी
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी संतोस्ध रोकडे अर्जुनी मोर. :- 2/10/2021 ला तालुका कांग्रेस तसेच तालुका युवक कांग्रेस यांच्या नैतृत्वात अर्जुनी वरून तावशी कडे जाणाऱ्या बायपास रस्त्याची दुरुस्ती व्हावी याकरिता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते
महाराष्ट्र कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांनी आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक राव चव्हाण यांच्याशी चर्चा करून अधिवेशनात ह्या विषयावर चर्चा करून तावशी रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळवून दिली त्या बद्दल महाराष्ट्र कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पटोले तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक राव चव्हाण यांचे अर्जुनी मोर. तालुका काँग्रेस व युवक काॅग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आभार मानले आहे.
तावशी बायपास रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाला लवकरात लवकर सुरू करून काम पूर्ण करण्यात येईल सर्व तावशी वाशियाना तसेच तिथून रहदारी करणाऱ्या सर्वाना त्याचा लाभ होईल.असे युवक काॅग्रेसचे नेते आनंदकुमार जांभुळकर तथा नगरसेवक अतुल बन्सोड यांनी कळविले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत